सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका येथे कासव अपवर्जक साधने (TED) व माश्यांचे कायदेशीर आकारमान (MLS) या विषयी जनजाग्रुती कार्यक्रम संपन्न
सिंधुदुर्ग –
सध्या मच्छिमारी हा व्यवसाय खूप लोप पावत चालला आहे. त्याची वेगवेगळी कारणे आहेत.त्याचाच एक भाग म्हणून शासनाने हे जनजाग्रती शिबीर हाती घेतले आहे.कारण वर्षानुवर्षे समुद्रात मासेमारी केल्यामुळे काही माशाच्या तसेच कासव यासारख्या प्राण्यांच्या जाती लोप पावत चालल्या आहेत.यामुळे भविष्यात मासेमारी या व्यवसायावर जगणार्यांना खूप वाईट समस्यांना तोंड द्यावे लागेल.याच गोष्टीचा विचार करता आता सध्या होणारा ह्रास रोखणे गरजेचे आहे नाहीतर पुढील पिढीचे भविष्य धोक्यात आहे. या अनुषंगाने मच्छिमारांना विषयाचे महत्व ओळखून देवगड येथील मच्छिमार समाजाला रिलायन्स फाउंडेशन व मत्स्य व्यवसाय विभाग,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कासव अपवर्जक साधने (TED) व माश्यांचे कायदेशीर आकारमान (MLS) या विषयी जनजाग्रुती मार्गदर्शन कार्यक्रम तारामुबंरी मच्छीमार व्यावसायिक संस्था मर्यादित, देवगड या संस्थेच्या कार्यालयात शुक्रवार दिनांक 12/01/24 रोजी सकाळी ठिक 11:30 वाजता देवगड येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे,सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्गचे देवगड-वेंगुर्ला परवाना अधिकारी मालवणकर,सागरमित्र अक्षय महाडिक,सारा गांवकर,दिप्तेश कोयंडे,गौरव धुरी,तसेच तारामुंबरी सोसायटीचे चेअरमन विनायक प्रभू ,व्यवस्थापक प्रदिप मुणगेकर,देवदुर्ग सोसायटीचे व्यवस्थापक क्रुष्णा परब त्याचप्रमाणे तारामुंबरी सोसायटीचा सर्व कर्मचारी वर्ग व देवगड मधील मच्छिमार उपस्थित होते.या कार्यक्रमप्रसंगी रिलायंस फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी रिलायंस फाउंडेशन कशा पद्धतीने काम करत आहे याबद्दल माहिती दिली,तसेच सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्गचे मालवणकर यांनी कासव अपवर्जक साधने (TED) व माश्यांचे कायदेशीर किमान आकारमान याबद्दल मार्गदर्शन केले,सागरमित्रांनी किसान क्रेडीट कार्ड यासारख्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्गचे श्री.श्रीधर अलगिरी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग तसेच श्री.बहर महाकाल जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सिंधुदुर्ग व तारामुंबरी सहकारी मच्छीमार व्यावसायिक संस्था मर्यादित देवगड यांचे सहकार्य लाभले .या कार्यक्रमाला मच्छिमारांचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.