You are currently viewing स्मृति भाग ३१

स्मृति भाग ३१

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३१*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय, सादर, साष्टांग प्रणिपात.

आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत. त्यांच्या स्मृतितील चवथ्या अध्यायात पुढील श्लोक येतात. दानाच्या संदर्भात येणारा हा श्लोक बहुतेक ठिकाणी चपखल बसतो पहा !!

 

*प्राणनाशस्तु कर्तव्यो यः कृतार्थो न सो मृतः ।*

*अकृतार्थस्तु यो मृत्यु प्राप्तः खरसमो हि सः ॥*

प्राण तर सर्वांना सोडायचे आहेतच ! पण जो कृतार्थ (दानादि सगळी कर्तव्यकर्मे करुन !) झालेला आहे, तो मरत नाही ! पण जो कृतार्थ झाल्याशिवाय मरतो तो गाढवासमानच असतो वा आहे.

आपण एखाद्याला गाढव वा कुत्रा म्हणणे, केवढा हलकल्लोळ माजवेल ना ! पण व्यासांचं म्हणणे किती गोड वाटत असेल ना ? कारण इच्छा असून व्यासस्मृति जाळण्याशिवाय काय करणार आम्ही ??😃😃

 

*मृतवत्सा यथा गौश्च तृष्णालोभेन दुह्यते ।*

*परस्परस्य दानानि लोकयात्रा न धर्मतः ॥*

ज्याप्रमाणे जिचे वासरु मेलेले आहे अशी गाय तृष्णा आणि लोभामुळे दोहली जाते , त्याचप्रमाणे आपापसात दिले गेलेले दान लोकयात्रेस्तव असते ! धर्मासाठी नाही !!

किती सटीक आणि स्पष्ट सांगितले आहे ना ? ” लेना देना बंद है, फिर भी आनंद है । ” हे स्वाध्यायी बांधवांचे वाक्य आठवल्याशिवाय कसे राहील ? पुन्हा एक सांगून ठेवले आहे ! पहा.

 

*अदृष्टे चाशुभे दानं भोक्ता चैव न दृश्यते ।*

*पुनरागमनं नास्ति तत्र दानमनन्तकम् ॥*

अशुभाच्या निवृत्तीस नजरेत न ठेवता जे दान दिले जाते आणि ज्या दानफलाचा भोक्ता कधीच दिसत नाही (अर्थात जे निष्काम कर्म भावनेने दिले जाते) ते दान शाश्वत असते .अशा दानी माणसाचे पुनरागमन होत नाही.

म्हणजे मोक्षच की !! सिध्दांतच सांगून ठेवला व्यासांनी !! आजकाल इन्कमटॅक्स चुकवण्यासाठी दान दिले जाते !! भरपूर दान देणार्‍याची यथेच्छ जाहिरात होते ! शिवाय आपलं झालेलं अशुभ लपवण्यासाठीही काही जण दान कबूल करतात ? हे कुणीच बसत नाहीत या व्यास मुनींच्या सिद्धांतात ना ? शिवाय पवित्रता नष्ट झालेल्या वा भ्रष्ट वेदहीन ब्राह्मणास दान दिलेले अन्न भयाने रडते , इतके स्पष्ट लिहीले आहे श्लोकांमधे . हे सामान्यांनी वाचले ना , तर काहीही न करता विनाकारण ब्राह्मण्य मिरवणारे वा देखावा करत जगणारे वा अभक्ष्य भक्षण करणारे , व्यसनी आणि असेव्य सेवन करणार्‍या ब्राह्मणांची मला चिंताच वाटते !!

 

*इन्द्रियाणां जये शूरो धर्मं चरित पण्डितः ।*

*हितप्रियोक्तिभिर्वक्ता दाता सम्मानदानतः ॥*

इन्द्रियांना जिंकणारा मनुष्य शूर असतो , धर्माचरण करणारा विद्वान असतो , हितकर आणि प्रिय बोलणारा वक्ता असतो आणि दुसर्‍यांना सन्मान देणारा दाता असतो.

याशिवाय श्लोकातील पावित्र्य वा मांगल्य काय असावं ?? शेवटी दोन श्लोक तर फार काही सांगून जातात. निरनिराळ्या भोजनपात्रांनी संकीर्ण, नानाप्रकारच्या संकरांनी संकीर्ण आणि योनीसंकराने संकीर्ण मनुष्य नरकात जातात. पङ्क्तिभेद करणारा, केवळ स्वतःपुरते भोजन बनवणारा, नित्य ब्राह्मण निन्दा करणारा, व्यर्थ हुकूम चालवणारा आणि धन घेवून वेद शिकवणारे हे पाच ब्रह्महत्यारे आहेत !पुन्हा प्रश्न येतोच !! पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?

सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा.🙏🙏

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे. वाचाल ना ?🙏🙏 उद्या शंख स्मृतिबद्दल पाहू.

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————

जग झपाट्याने बदलत चाललंय…🌐

टेक्नॉलॉजीमध्ये पण निरंतर प्रगती होत आहे..🤗

 

*काळाप्रमाणे आपणही बदलणार की नाही ?*🤔

 

*बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायाला अधिक सक्षम करा.*😇

 

👉 *खाद्य पदार्थ क्षेत्र* म्हणजे *फूड इंडस्ट्री* मध्ये डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

 

👉डिहायड्रेशन पद्धतीचा अवलंब करुन आपण *रेडी टू कूक, रेडी टू इट तसेच पावडर, फ्लेक्स* या प्रकारात शेकडो प्रॉडक्ट्स बनवू शकतो.

 

👉 फळं, भाज्या, हंगामी पिके, मासे इत्यादी वस्तू अनेक कारणांमुळे बऱ्याच अंशी खराब होतात, वाया जातात, त्याचा पूर्ण वापर होत नाही.

 

👉 *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी* वापरुन या सर्व वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, वर्षभर त्याचा लाभ घेता येईल.

 

👉 सध्या सर्वत्र डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे आणि या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्सची रेंज, आवाका पण खूप मोठा आहे.

 

👉 *सखोल प्रशिक्षण, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे डिहायड्रेशन व्यवसायात चांगली कामगिरी करु शकतो, भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.*

 

👉 *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने 19-20-21 जानेवारी रोजी *कुडाळ* येथे 3 दिवसीय *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.

 

👉 हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित असून व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

 

👉 हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया *DHY* असा व्हॉट्स ॲप मेसेज *8767473919* या क्रमांकावर पाठवावा.

 

👉 हा मेसेज आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करा, सहकार्य करा.

 

🛑 *टीम अभिनव*

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा