You are currently viewing गाव माझे सुंदर…(कापडणे)

गाव माझे सुंदर…(कापडणे)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*गाव माझे सुंदर…(कापडणे)*

 

“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी..”ह्या संस्कृत वचना

नुसार माता आणि मातृभूमी यांचे स्थान स्वर्गाहूनही श्रेष्ठ

असते यात मुळीच शंका नाही.माणूस विविध कारणांनी गाव

सोडून बाहेर पडतो, त्याची इच्छा असो वा नसो, त्याला पोटा

मागे धावावेच लागते.ज्यांना गाव सोडावे लागले नाही, ते गावातच सुखी आहेत असे ज्यांना वाटते ते तर अधिकच

भाग्यवान म्हटले पाहिजेत.आपण जन्मलो ते घर व आपले गाव

या पेक्षा माणसाला काहीही अधिक प्रिय नसते.जन्मल्यापासून

त्या गावाशी आपली नाळ जुळलेली असते, आणि ती कितीही

वय झाले व जन्मभूमी पासून आपण कितीही लांब राहिलो तरी

कधीच तुटत नाही हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते

नि मला वाटते तुमचाही हाच अनुभव असावा.

 

कापडण्याचे सुपुत्र व पूर्ण धुळे जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकार विरोधात

नेतृत्व करणारे विष्णुभाऊ पाटील उर्फ विनायक तुळशिराम पाटील यांनी मातृभूमी बरोबरच ज्या गावच्या मातीत ते जन्मले

वाढले त्या गावाचा विकास करण्याचेही व्रत घेतले होते व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते पाळले.देश स्वतंत्र व्हावा म्हणून वयाच्या १४/१५ वर्षापासूनच त्यांनी देशा साठी पडेल

ते काम करण्याचे ठरवून ते केले व मातृभूमीसाठी तुरूंगवासाची

शिक्षा ही भोगली.

 

अशा थोर माणसाच्या पोटी माझा जन्म झाला म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते.बालपण फारसे आठवत नसले

तरी ते वय असे असते की काही ठळक घटना मनावर कोरल्या

जातात त्या कायमच्याच! ती अशी की माझे वडील अबकडचे

कॅलेंडर भिंतीवर टांगून मला अबकड शिकवित आहेत हे मला

आजही मन:चक्षुंसमोर दिसते. माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा

तेव्हा त्यांनी केला म्हणून तर आज मी त्यांच्या आठवणी लिहू

शकते आहे. आज माझे पंच्याहत्तर वय पाहता त्यांनी इतक्या

जुन्या काळी कापडण्याच्या शाळेत तर पाठवलेच पण पुढे

पुढील शिक्षणासाठी धुळ्याला होस्टेलला ठेवले.

 

कारण ते अत्यंत पुरोगामी विचारांचे असल्यामुळे गावाच्या

विकासा बरोबर कौटुंबिक विकासालाही प्राधान्य देणे स्वाभाविक होते. स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते देशासाठी लढत होतेच

पण गाव त्यांच्या नजरेसमोरून कधीही हटला नाही.बेचाळीसच्या चळवळीत ह्या देशभक्तांनी भूमिगत राहून

ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते. पण त्याच वेळी गांधी आश्रमात राहून अस्पृश्यता निर्मूलनासाठी

हरिजन वस्तीत वर्ध्याला त्या काळात ते घर घेऊन राहिले,स्वत:च्या कुटुंबियां समवेत मिष्टांन्न भोजन दिले व

सेवाभाव रूजविला.

 

मी,ते गाव विसरले नाही हे सांगतांनाच माझ्या लहानपणीचे

एक दृश्य सर्रकन माझ्या नजरेसमोरून तरळून गेले ते असे..

कदाचित मी पहिली दुसरीतच असेल, एका भल्या सकाळी

खादीचा शुभ्र वेष परिधान केलेले माझे वडिल, दोन शिपाई

व दोन शिक्षक असे आमच्या घरासमोरच चौठ्यात उभे राहून

जी मुले शाळेत नाव असून शाळेत जात नव्हते त्यांना घराघरातून बाहेर काढून शिपायांच्या मदतीने शाळेत पाठवायच्या प्रयत्नात होते. मोठे मजेशिर दृश्य होते ते! मला

आत्ता ही डोळ्यांसमोर दिसते आहे. मी ओट्यावर उभी राहून

गंमत पाहते आहे.पोरं मोठ्याने भोकाड पसरत ओट्यावर लोळण घेताहेत, आरडाओरड करत किंचाळत आहेत.काही मुले तर शिव्याही देत..”बयना बाट्टोड! माले सोड ना रे!”मंडळी,

७० वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते आहे मी तुम्हाला! सगळी गल्ली

मुलांकडे बघून हसते आहे, व आता ही मला ते आठवून हसू

आवरत नाहीये.

 

मंडळी, “ शाळा शिकिसन काय करनं से? वावरम्हाज जानं

से ना? असं म्हणण्याचा व वागण्याचा तो काळ होता. शिक्षणा

विषयी समाजात प्रचंड अनास्था होती.”ब्रेन वॅाशिंग” करून

फायदाच नव्हता, कारण पटतंच नव्हतं ना? गल्ली मध्ये हा

फुकटचा तमाशा ओट्यावर बसून खूप लोक पहात हसत असत.अशा मुलांना हातात घट्ट पकडून शिपाई शाळेत घेऊन

जात.कारण रस्त्यात ते हात झटकून पळून जायची व लपून बसायची शक्यता असे. हा असा

कार्यक्रम ८/१५ दिवस करावा लागे. तेव्हा कुठे मुले रूळत असत.त्यातच गरीबीमुळे काही मुलांना आई वडिल शेतात गेल्यावर भावंडांना सांभाळावे लागे, विशेषत: मुलींवर ही संक्रात कोसळून त्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असे.

पूर्वी कुटुंब नियोजन हा प्रकारच तेव्हा नव्हता.त्या मुळे गरीब

घरात मुलांची प्रचंड आबाळ होत असे. शेवटी परिस्थितीच

माणसाला घडवते हे ही खरेच आहे!

 

वडिलांचे शाळेकडे कडक लक्ष असे.वडिल लोकल बोर्डातही

काम करत होते.अचानक केव्हाही शाळेला त्यांची व्हिजिट

असे. सारे शिक्षक त्यांना वचकून असत.शिवाय त्या काळात

माझे चुलत आजोबाही (तानाजी तुकाराम पाटील, कापडणे)

शिक्षणाधिकारी होते. त्यांची ही शाळेला अधून मधून भेट असे.

वडिलांचे गावाच्या विकासाकडे पूर्ण लक्ष होते.ग्राम सुधारणा

व समाज सुधारणा हातात हात घालून चालू होत्या.गाव व देश

त्यांचा ध्यास होता किंबहुना श्वास होता म्हटले तरी चालेल.

 

तुम्ही एवढे वाचलेत, गोड मानून घेतलेत…

खूप खूप धन्यवाद मंडळी, आता भेटू पुढच्या रविवारी.

तो पर्यंत बाय् बाय्, आभारी आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि: १ जानेवारी २०२४

वेळ: प्रसन्न सकाळ, नविन वर्षाची

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

. .॥श्री॥

 

.1 जानेवारी २०२४…

 

नव वर्षाच्या खूप शुभेच्छा, कष्टाला ना हारू

आपले आपण चालवायचे असते पहा ना तारू..

 

मनगट आपुले भक्कम आहे पाणी तजेलदार

छे! छे..छे..छे..! जीवनात कधी न पाहिन हार..

 

वर्ष येती आणि जाती माणूस थोडी आहे?

कर्तृत्वाने घडतो माणूस वर्षाचे हो काय ?…

 

लाथ मारा पाणी काढा दोष नको ना कोणा

स्वबळाची खाईन भाकर हाच करारी बाणा..

 

मदतीचा देऊन हात हो सावरू एकामेका

निश्चय करूनी आज पासूनी दुर्गुण सारे फेका..

 

मायमाती देश आपुला स्वर्ग बनवू या त्याला

आज पासूनी सोडूनी द्या हो नको तो “एकच प्याला”..

 

खतपाणी बुद्धिचे घालून झेंडे अटकेपार

मायभूमीला बनवू आपण विश्वाचे महाद्वार ..

 

विश्वशांतीचे पाईक आम्ही जगतास चिंतीतो सुख

माणूस व्हावा सुखी फक्त हो हीच आमुची भूक..

 

जयहिंद .. जय महाराष्ट्र..🙏🏼🙏🏼

 

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा