You are currently viewing अंतर्मनाच्या गूढ गर्भी ते रहस्य

अंतर्मनाच्या गूढ गर्भी ते रहस्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अंतर्मनाच्या गूढ गर्भी ते रहस्य*

 

एक सुख प्रवासाचे सहलीचे

नियमांच्या अलौकिक बंधनाचे |

निसर्गही चालतसे नियमात

अति हो माती बळी निर्बन्धनाचे ||१||

फणसखोल शाळा सहल प्रिती

आनंद सोहळा सुहृद प्रीतीचा |

बालकांच्या विकासाची शुभ रिती

शिक्षक पालक विवेक प्रीतीचा ||२||

प्रथम सुप्रभाती जमूनी सारे

नमस्कारिला आदिपुरुषाशी |

तैसा नमिला सूर्यनारायणाशी

सर्वव्यापीसाक्षी रक्षी प्रत्येकाशी ||३||

शुभ सुचिंतनी निघालो घेऊन

सुविवेक पालखी सहदर्शन |

प्रथम घेतले भराडी दर्शन

रक्षिते देत कवच सुदर्शन ||४||

पुढे सागरतीरी कुणकेश्वर

महादेव भक्तवत्सल दर्शन |

साऱ्यांच्या छत्रछायेत हो सुंदर

छायाचित्र मोही स्मरण दर्शन ||५||

वारी सहलीची पवनपंढरी

वात चल चक्की विद्युत निर्मिती |

सागरतटी तिथे उद्यान भारी

नेत्र सुखावले पाहुनी निर्मिती ||६||

बाल पाल ढाल शिष्य गुरु बंधु

चक्रवती धावे अनुभव छान |

सर्व मोही सारे सुखाचे हे क्षण

गणेश मंदिर रम्यताही छान ||७||

पोखरबाव निसर्गरम्य स्थळ

गणेश दर्शनाची मध्यान्ह वेळ |

पोटपूजा प्रसाद भोजन वेळ

अमृताची गोडी परिपाक वेळ ||८||

व्यवस्थापकांनी केले सहाय्य ते

मध्यान्ह काळी या गणेश कृपे |

रम्य सुग्रास भोजन जाहले ते

मुखवाटे वदनिकवळ सोपे ||९||

विश्रांतीनंतर दुर्ग देई हाक

यारे बाळांनो अभ्यासा इतिहास |

विजयी विजयदुर्ग अष्ट शत

झाले आयुर्मान थोर इतिहास ||१०||

अपार पार विजयदुर्ग सार

अनाकलनीय हे तंत्र विज्ञान |

पूर्वजांचे गूढ मंत्रमुग्ध करी

पाहुन हो थक्क प्रगत विज्ञान ||११||

अभेद्य तटा गुप्त स्तब्ध रचिता

कसा कूट कलंका उध्वस्त करी |

कुठली हो क्रेन इथे वाही भार

कशी अश्मावरी अश्म आस्ते धरी ||१२||

कशी जादू वाटे परि सत्य आहे

पूर्वजांचा वारसा लाभला आहे |

बैठक रचना ध्वनी सूक्ष्म वाही

पडे टाचणीही नाद येत आहे ||१३||

आठशे वर्षांचा हा विजयदुर्ग

हजारों शतकी ज्ञान इतिहास |

संशोधकांनो हा संशोधित आहे

विश्व सुखा भारताचा इतिहास ||१४||

इथे दगड माती खड्डे खंदक

सागरतीरी दुर्गतटी खडक |

इथे अन्यायाला ठेच खडकाची

न्याय धर्म राज थोर दंडकाची ||१५||

आधी शेजार क्षेत्र घेऊ दर्शन

करु देशाटन पर्यटनातून |

देश विदेश ज्ञानाभ्यासा दर्शन

आधी भारतास घेऊ अभ्यासून ||१६

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. : वेंगुर्ला,

जि. : सिंधुदुर्ग, राज्य : महाराष्ट्र.

अशी सुंदर सहल आमची

सकलांच्या मन प्रसन्नतेची

🌹🌹🌹

🙏🙏🙏

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा