You are currently viewing कोकण रेल्वेच्या विविध प्रश्न संदर्भात प्रवासी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 

कोकण रेल्वेच्या विविध प्रश्न संदर्भात प्रवासी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 

कोकण रेल्वेच्या विविध प्रश्न संदर्भात प्रवासी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

ओरोस –

कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे आणि त्याचा फायदा मात्र परराज्यासाठी होत असून जिल्हा मुख्यालयाचे सिंधुदुर्ग स्टेशन असताना जलद गाड्यांना थांबा नाही , तिकीट कोटा नाही , कोकण रेल्वे महामंडळ ऐवजी भारतीय रेल्वेचा समावेश करा , सावंतवाडी टर्मिनल व्हावे ,रेल्वे शिल्पकार मधु दंडवते यांच्या तैल चित्राचे फोटो सिधुदग सह प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असावे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांना कोकण रेल्वे प्रवासी सिधुदुर्ग संघटनेच्या वतीने देण्यात आले
सिंधुदुर्ग नगरी येथील विश्रामगृह येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्याबाबत बैठक संपन्न झाली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे रेल्वे प्रशासनाचे प्रमुख अधिकारी यांना निवेदन देण्यात आले . यावेळी प्रवासी संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष शुभम परब ,सल्लागार नंदन वेंगुर्लेकर , सचिव प्रकाश पावसकर , रानबांबुळी सरपंच परशुराम परब , कार्याध्यक्ष नागेश ओरोसकर ,उपाध्यक्ष संतोष वालावलकर ,लीलाधर अनावकर , सहसचिव बाबुराव गावडे , खजिनदार अनंत चव्हाण ,पांडुरंग मालणकर ,नारायण मांजरेकर , लता खोत , महेश पारकर ,रामचंद्र घोगळे , संजय वालावलकर , सुनील पाटकर , अजय मयेकर ,सुनील पाताडे ,आदींसह कार्यकारणी सदस्य पंचकोशी रहिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे सल्लागार नंदन वेंगुर्लेकर यांनी कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनेचे महत्त्व आणि याबाबतची सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कार्यकारणी करणे आवश्यक आहे , येथील प्रमुख मागण्यांबाबत निवेदन देण्याबाबत चर्चा झाली जिल्ह्यातील सर्व स्टेशन वरील संघटना कार्यरत होत असून लवकरच कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष जिल्हा संघटना कार्यरत करण्याबाबत बैठक घेतली जाईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे २१ जानेवारी रोजी कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते .यांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तैल चित्र लावण्याबाबत ठरविण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात सावंतवाडी टर्मिनल तात्काळ करण्यात यावे व या टर्मिनल ला प्राध्यापक मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे , कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता भारतीय रेल्वे बोर्ड मध्ये विलीनीकरण करावे , सिधुर्ग स्टेशन वर तिकीट आरक्षण कोटा पीआरएस तात्काळ सुरू करावा , रत्नागिरी अंतर्गत येणारे सब डिव्हिजन ऑफिस सिंधुदुर्ग नगरी – रानबाबुळी येथे सुरू करावे जनशताब्दी ,नेत्रावती , मत्स्यगंधा , एलटीटी मडगाव ,मेंगलोर , नागपूर मडगाव ,पुणे या जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्टेशनवर थांबा देण्यात यावा अमृतभारत स्कीम योजनेचा सिंधुदुर्ग स्टेशन वर स्टॉल असावे , सिधुदग स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन निवारा शेड सुधारावेत , दिवा पॅसेंजर प्रमाणे रात्रीची सावंतवाडी दादर पॅसेंजर ट्रेन सुरू करावी मडूरा ते दादर मडूरा स्वतंत्र ट्रेन चालू करावी , सावंतवाडी टर्मिनल लवकरात लवकर चालू करावे , रो रो ट्रेनचाथांबा सिंधुदुर्ग स्टेशनवर करण्यात यावा जेणेकरून मालवाहतूक मार्केट यार्ड साठी फायदेशीर ठरेल , दिवा पॅसेंजर ला मालवाहतूक डबा जोडावा ,तुतारी , कोकण कन्या , मांडवी रेल्वे जनरल कोच डबे वाढवावे ,सर्व प्रवासी गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरच लावण्यात याव्यात , अनाव , पंणदूर ,तळगाव सुकळवाड रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्त्यावर ब्रिज -उड्डानपुल उभारावे , रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना रेल्वे नोकरी समाविष्ट करावी आदींसह विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आले आजच्या या बैठकीत नेमण्यात आलेल्या कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष शुभम परब ,सचिव प्रकाश पावसकर , व संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांचे सल्लागार नंदन वेंगुर्लेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यापुढे संघटनेची लवकरात लवकर बैठक घेऊन येथील न्याय प्रश्नांबाबत चर्चा करावी आवश्यक त्या कार्यकारणीतील सदस्यांनी रेल्वेच्या प्रश्नाबाबत होणाऱ्या आंदोलन उपोषण कार्यक्रमाबाबत सहकार्य करावे असे आवाहन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =