You are currently viewing व्ही एन नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

व्ही एन नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

व्ही एन नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

बांदा

श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कलागुण सादर केलेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक विद्याधर परब, किनळे सरपंच दीपक नाईक, मडूरा सरपंच उदय चिंदरकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, उद्योजक शशिकांत पित्रे, भाऊ वळंजू, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सानिका गावडे, मडुरा उपसरपंच कृष्णा गावडे, लोकल समिती सदस्य सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायन करून पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका सौ. नीती साळगावकर यांनी स्नेहसंमेलनाचा आढावा सादर केला. त्यानंतर सहशिक्षिका तेजस्वी गावडे यांनी २०२३-२४ चा अहवाल वाचन केले. मुलांनी केलेल्या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यशवंत परब याने हस्तलिखिताचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य, कोळी नृत्य, पथनाट्य, भाषणे, गायन, नाटक व असे अनेक नृत्यांचे प्रकार सादर केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रीग्स यांनी केले तर आभार सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर व प्राची परब यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nine =