लोरे नंबर 1 येथील शासकीय जागेतील अतिक्रमण न हटविल्यास 18 रोजी धरणे आंदोलनाचा इशारा
कणकवली
लोरे नंबर एक येथील शासकीय जागेतील अतिक्रमण हटवावे अन्यथा गटविकास अधिकारी कणकवली यांच्या कार्यालयासमोर 18.1.2024 रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच गटविकास अधिकारी यांनी कार्यवाही न केल्यास यावर 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा लोरे नंबर एक येथील ग्रामस्थांनी दिला आहे