You are currently viewing शिवजयंती सोहळ्यानिमित्त श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या पटांगणावर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

शिवजयंती सोहळ्यानिमित्त श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या पटांगणावर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

शिवजयंती सोहळ्यानिमित्त श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या पटांगणावर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

बांदा

शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत.येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर,उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत,शिक्षक जे. डी.पाटील,संकेत वेंगुर्लेकर,अक्षय मयेकर,शुभम बांदेकर,नारायण बांदेकर,रीना मोरजकर,स्वाती पाटील,वेदीका गावडे,आदी उपस्थित होते.

मुख्य शिवजयंती सोहळा १९ रोजी येथील खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या पटांगणावर होणार आहे.याठिकाणी किल्ल्याची भव्य दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.स्वराज्य प्रतिष्ठान हे “शिवविचार हाच आमचा धर्म” हे ब्रीद घेऊन कार्य करत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला सविस्तरपणे माहिती व्हावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन जि.प. केंद्रशाळा बांदा नं.१ येथे करण्यात आले आहे.अंगणवाडी ते इयत्ता पहिली या गटासाठी रंगभरण ठेवण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी या गटासाठी गडकिल्ले हा विषय,इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग हा विषय तर इयत्ता नववी ते खुला गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोट्रेट हा विषय ठेवण्यात आला आहे.यातील विजेत्यांना पहिल्या गटासाठी अनुक्रमे रुपये ५००,३००, २०० तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी रुपये १०० पारितोषिक देण्यात येणार आहे.प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उर्वरित सर्व गटांसाठी

रुपये १०००, ७०० , ५०० तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी रुपये २०० पारितोषिक देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या स्पर्धकांनी केदार कणबर्गी – मो. ९४२२३९४०७५ यांच्याशी संपर्क साधावा.चित्रकलेचा कागद संस्थेतर्फे देण्यात येईल.रंग साहित्य स्वतः स्पर्धकांनी आणावे.

तसेच रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ३ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन जि.प. केंद्रशाळा बांदा नं.१ येथे करण्यात आले आहे.यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी आणि इयत्ता नववी ते खुला असे गट असून शिवकालीन १६ वे ते १७वे शतक हा विषय ठेवण्यात आला आहे.यातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.२ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख २५० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे करण्यात आले आहे.स्पर्धा दुपारी २ वाजता सुरु होईल.इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी “मला आवडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा” हा विषय असून यासाठी सादरीकरण वेळ ३ ते ५ मिनिटे आहे.इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी स्वराज्याचे खंबीर सरनौबत हंबीरराव मोहीते, किंवा कुशल सेनानी सेनापती कुडतोजी ऊर्फ प्रतापराव गुर्जर हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी “शिवरायांचा तिसरा डोळा अर्थात बहिर्जी नाईक किंवा घोडखिंडींचे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेना” हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. ११वी ते खुला गटासाठी “स्थापत्य शास्त्र अभियंता हिरोजी इंदलकर किंवा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे” हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००,७००,५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. २ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख २५० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी शुभम बांदेकर मो. ९४०३४८९५६८ , संकेत वेंगुर्लेकर,मो. ९०१११०७५६२, यांच्याशी संपर्क साधावा.

रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी वेषभूषा स्पर्धा व स्टॅच्यू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजता खेमराज मेमोरीयल प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. वेशभूषा स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी,इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व खुला गट असून ऐतिहासिक (शिवकालीन १६वे ते १७वे शतक) हा विषय ठेवण्यात आला आहे.स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख २५० रुपयांचे पारितोषिक

प्रतिक्रिया व्यक्त करा