You are currently viewing कणकवलीकरांना आनंद देणारा हा पर्यटन महोत्सव – केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे

कणकवलीकरांना आनंद देणारा हा पर्यटन महोत्सव – केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे

कणकवलीकरांना आनंद देणारा हा पर्यटन महोत्सव – केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, सौ. निलमताई राणे, आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली पर्यटन महोत्सवाची सांगता

कणकवली :

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ ला ला ११ जानेवारी पासून सुरुवात झाली. तर १४ जानेवारी २०२४ ला पर्यटन महोत्सवचा समारोप झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, सौ. निलमताई राणे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, अभिनेता दिगंबर नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आदी. उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, कणकवली पर्यटन महोत्सवाचे सुंदर आयोजन आ. नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी चांगले केलं आहे. आता तुम्ही चांगले काम करीत आहात, तसेच जनतेची सेवा करा. माझा पाठलाग करताना पदाचा आणि गुणांचाही करा. कणकवलीकरांना आनंद देणारा हा महोत्सव आहे.

मला कणकवलीने खूप काही दिलं आहे. मी पहिली निवडणूक जिंकली. त्यामुळे गेली ३४ वर्षे पदावर राहिलो आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. आपण २१ व्या शतकात आहोत, जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत ११ व्या नंबर वरुन नरेंद्र मोदी यांच्यामुळे ५ व्या नंबरवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तिसऱ्या नंबरवर भारताला नेण्याचा संकल्प केला आहे. कोकण आणि राज्य आणि देशाचे उत्पन्न वाढेल. कोकणात उद्योजक वाढले पाहिजेत. तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे. उद्योगातून समृध्दी आणि उज्ज्वल भविष्य घडवल पाहिजे. प्रगतीकडे चला..बाजूला गोवा आहे. दरडोई उत्पन्न साडेचार लाख आहे, आपलं दोन लाख चाळीस हजार आहे. तरुणाने व्यवसायाकडे जावे, फूड प्रोसेसिंग उद्योग वाढले पाहिजेत, असे आवाहन ना. राणे यांनी केले. यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत, राजेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + ten =