इचलकरंजी : प्रतिनिधी
महाराष्ट्र पञकार संघाच्या वतीने इचलकरंजी येथील जेष्ठ पञकार रामचंद्र ठिकणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अतिग्रे येथे घोडावत काॅलेजमध्ये एका शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते रामचंद्र ठिकणे यांना करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.अशोकराव माने , महाराष्ट्र पञकार संघाचे विलासराव कोळेकर, अनिल उपाध्ये ,ब्रम्हाकुमारी शिवाली दिदि, उद्योजक संदीप कारंडे यांच्यासह विविध मान्यवर, पञकार व नागरिक उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

