*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ३०*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत . त्यांच्या स्मृतितील चवथ्या अध्यायात पुढील श्लोक येतात . गृहस्थाश्रम धर्मात त्यांनी दानावर लिहीलेले वाचण्यासारखे आहे .
*अदाता पुरुषस्त्यागी धनं संत्यज्य गच्छति ।*
*दातारं कृपणं मन्ये मृतोsप्यर्थं न मुञ्चति ॥*
दान न करणारा पुरुष त्यागी असतो , कारण तो सारेच धन या लोकात सोडून जातो . दान देणार्यास मी कृपण ( कंजूष ) समजतो कारण तो मेल्यावरसुद्धा त्या धनास सोडत नाही !!
असे म्हणण्याचे कारण दानी माणसास ते दान दिले गेलेले धन जसेच्या तसे पुढील जन्मात प्राप्त होते , हा ज्ञानियांचा उपदेश असतो . पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणारी माणसं यावर विश्वास ठेवणार नाहीत . या जगात नष्ट काहीच होत नाही ! फक्त रूप बदललेले असते संयोग आणि वियोगाने , हे विज्ञान जर सांगत असेल तर आत्मा ही नष्ट होत नाही ! यावर आम्ही विश्वास का ठेवू नये ?? ऋषिंवर श्रद्धा हाच आमचा धर्म आहे .असो , विषय दानाचा .
खरंच एक सुभाषित असे आहे ,
*दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयोर्भवन्ति वित्तस्य ।*
*यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥*
म्हणजे वित्ताच्या तीन गति आहेत . दान देत नाही वा जो भोग घेत नाही त्याच्या वित्ताची तिसरी गति होते — नाश !! खरंच , आमच्या दीर्घदृष्टी वा सुदूरदृष्टी शास्त्रवेत्यांनी ( विज्ञानवेत्यांनी नाही ! कारण आम्ही ” धर्मविज्ञान ” असा शब्दप्रयोगसुद्धा करतो . सायन्स व शास्त्र वेगळे ! आमच्याकडे शब्दांचे खूप सखोल अर्थ दडलेले आहेत , ते जाणले पाहिजे ! ) *वृद्धं तीर्थे विनिक्षिपेत् ।* म्हणजे आपल्याजवळ जे जास्त आहे असे तीर्थांचे ठिकाणी अर्पण करावे , असे सांगितले आहे . अंदाजे १९६९/७०च्या वेळेस मी लहान असतांना पिंपळनेरहून आजोळी बडोद्यास जातांना तापी नदी लागायची . पुलावरील रेल्वेची धडधड गडगड ऐकतांना मजा वाटायची . वडील तेंव्हा दहा पैसे द्यायचे व सांगायचे ” अर्पण कर नदीचे पात्रात आणि नमस्कार कर तापीला ! ” मी अर्पण करुन नमस्कार करायचो आणि वडिलांचा व आईचा प्रसन्न चेहरा मग न्याहाळायचो . तेंव्हापासून हा चरण माझ्या रक्ताचा हिस्सा झाल्यासारखा वाटतो . पुढे सर्व स्वाध्यायींचे हृदयस्थ प.पू. दादाजींकडून ” देणार्याला अहंकार नको व घेणार्याला न्यूनगंड नको व देणारा देव आहे याची जाणीव असण्यासाठी मंदिरांचे निर्माण झाले ” , ही गोष्ट समजली . मी धन्य झालो . आता थोडा विनोदी श्लोक पाहू !😂😂
*कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति।*
*अस्पृशन्नेव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति॥*
कंजूष माणसासारखा दाता कधी झाला नाही व कधी होणारही नाही ! कारण तो धनाला स्पर्श न करताच दुसर्याच्या स्वाधीन करत असतो ! ( म्हणजे मेल्यावर ) काय काय लिहून ठेवलंय खरंच शोधलं तेव्हढं थोडं ! आता आज थांबतो .
पुन्हा प्रश्न येतोच !! पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?
सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा .🙏🙏
विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मिडिया*
*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*
*सविस्तर वाचा👇*
————————————————
♦️ *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*♦️
👉 सगळ्यात वेगाने वाढणारी आणि भरपूर पैसा देणारी इंडस्ट्री म्हणजे *फुड इंडस्ट्री* या फुड इंडस्ट्री मध्ये *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स* मोठया प्रमाणात वापरले जातात.
👉 *सॉसेस, केचप, चटण्या, रेडी टू कूक, रेडी टू इट प्रॉडक्ट्स तसेच हॉटेल, बेकरी, आईस्क्रीम, ज्युस, मेडिकल आणि घरगुती वापरासाठी या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे.*
👉 अनेक वेळा उत्पादन जास्त झाल्याने आणि त्याचा उठाव न झाल्याने अनेक भाज्या, फळे यांना दर मिळत नाही आणि त्या खराब होतात, फेकून दिल्या जातात. अशा वेळी डिहायड्रेशन पद्धतीने त्याचा वापर करता येतो, टिकवता येतं, त्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळून चांगला नफा कमावता येतो.
👉 अल्प भांडवलात आणि छोट्याशा जागेतून, अगदी घरातूनही करता येण्यासारखा व्यवसाय म्हणजे *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स तयार करणे.*
♦️ *डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय ?*
♦️ *त्याचा उपयोग काय ?*
♦️ *आपण काय काय डिहायड्रेट करु शकतो ?*
♦️ *त्यातील व्यवसाय संधी काय ?*
♦️ *या व्यवसायाला भवितव्य काय ?*
♦️ *हा व्यवसाय कोण करु शकतो ?*
♦️ *या व्यवसायासाठी गुंतवणूक किती लागेल ?*
♦️ *हा व्यवसाय आम्हाला जमेल काय ?*
असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील….🤔
🤗सकारात्मक दृष्टिकोन, योग्य मार्गदर्शन आणि कष्ट करायची जिद्द असलेली कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय करु शकते, आर्थिक उत्पन्न कमवू शकते.🫰🏻💵
👉 डिहायड्रेशन प्रॉडक्ट्स तयार करणे हा एक खूप मोठी संधी असलेला व्यवसाय आहे. *पानं, फुलं, फळं, भाज्या, धान्य, औषधी वनस्पती आणि मासे* इत्यादी तूम्ही डिहायड्रेट करु शकता आणि त्यातून खूप चांगला नफा कमवू शकता.
*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*🥬🥦🍆🌽🥒🥭🍌🌽🍍🍤
♦️ *19-20-21 जानेवारी 2024 कुडाळ, सिंधुदुर्ग*
👉 डिहायड्रेशनचं हे तंत्र, मंत्र, महत्त्व आणि त्याचा उपयोग याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनीतर्फे या 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
👉 अधिक माहितीसाठी कृपया *DHY KDL* हा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावा.
♦️ *टीम अभिनव*♦️
8767473919
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*