इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील हायकिंग व नेचर कलबच्या वतीने कुंभोज, नेज, मजले परिसरातील डोंगर रांगावर विद्यार्थी व विद्यार्थिनीनी गिरीभ्रमण तसेच निसर्ग सानिध्याचा अनुभव घेतला.
सर्वप्रथम कुंभोज येथील देवस्थान बाबूजमाल दर्गाहचे (देवस्थान) चे दर्शन घेऊन दर्गाह परिसरातील स्वच्छता साफसफाई करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बाबुजमाल दर्गाह जवळ असलेल्या डोंगरावर परिभ्रमणाचा आनंद घेतला. त्यानंतर मजले, कुभोज येथे पसरलेल्या डोंगरावर परिभ्रमण करण्यात आले. तेथील निसर्गातील अनेक दूर्मिळ वृक्षाची माहिती घेण्यात आली. तेथील पशू पक्षी यांची नोंद घेण्यात आली.
यावेळी हायकिंग व नेचर ग्रुपचे प्रमुख प्रा. एफ.एन. पटेल, डॉ. माधव मुंडकर, डॉ. रामेश्वर सपकाळ, डॉ. देवेंद्र बिरनाळे, प्रा सौरभ पाटणकर डॉ. प्रवीण पोवार, प्रा प्रमोद काळे सह महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या मोहीमसाठी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांचे मार्गदर्शन लाभले.