You are currently viewing ग्राहक पंचायत वैभववाडी शाखेची बुधवारी विशेष सभा

ग्राहक पंचायत वैभववाडी शाखेची बुधवारी विशेष सभा

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखेचे विशेष सभा बुधवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता प्रतिक कॉम्‍प्‍युटर सेंटर वैभववाडी येथे आयोजित केली आहे. यावेळी गेल्या सहा महिन्यांमध्ये तालुका शाखेने केलेल्या कार्याचा आढावा घेणे. ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर चर्चा करणे. नवीन सभासद नोंदणी करणे. राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करणे तसेच संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहिती व कार्यदिशा या पुस्तकाचे प्रकाशन करणे या विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे. जिल्हा शाखेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य यांनी वेळेमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन तालुका संघटक श्री शंकर स्वामी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − 1 =