*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जीवन एक जत्रा*
जगणं म्हणजे एक जत्रा…
जत्रेतल्या माणसांची रांग
मुंगीसारखी माणसं इतस्ततः विखुरलेली….
पुढे पुढे जात राहायचं
मागच्याने ढकलून दिल्यावर….
राहायचं हिंदकळत
जत्रेतील खेळणी नि स्वप्नांची मालिका
असते क्षणभंगुर…
किल्ली फिरवल्यावर चालू होणारी…
नंतर थांबणारी…. कायमची!
सामावून घेते जत्रा पोटात
सामावून जातो आपण तिचा एक अविभाज्य भाग होऊन…
राहत नुसता द्विडमूढ… अस्थिर
कोरड्याचे वार पाठीवर मारणारे….
हातावर जळता कापूर ठेवून नाचणारे….
कित्येकांच्या डोळ्यांतील धडपड जगण्यासाठीची…..
पोटाची खळगी भरण्यासाठी
भूक न शमणारी….
जत्रा राहते बोलवत…
तिच्याआत सामावून जाताना
प्रत्येक अस्तित्व होत जातं नास्तित्व
तिच्यातला एक भाग होऊन राहतो जीव
जत्रेतल्या कळसूत्री बाहुलीसम
राहतो नाचत प्राक्तनाच्या दोरीसवे
उड्या मारत… कर्कश गोंगाटात
माणसांच्या जत्रेत असते दिशाहीन वाटचाल……
मनातील विचारांची वावटळ राहते भिरभिरत….
कोऱ्या कागदावरील काळे अर्थहीन शब्द त्यांचा चालत असतो झिम्मा खेळ
शब्दांच्या फेऱ्यातून अखेरीस….
हृदयाच्या गाभाऱ्यातून साकारते कविता….
मनाचा अंतर्नाद राहतो गुणगुणत….
कितीतरीवेळ अंतरीच्या सुनसान भिंती
डुलत राहतात तालावर…….
*मानसी जामसंडेकर*
*गोवा*
*संवाद मिडिया*
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗
*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻♀️संधीचा लाभ घ्या🤩
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४
*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी
♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४
*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा
👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*
👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील
👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)
👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता
👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल
👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳
👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜
👉 *Personal attention with hands on practice*
👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗
📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*