You are currently viewing जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा

सिंधुदुर्गनगरी

  जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेंदवारांसाठी कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे.या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याऱ्या ईच्छुक उमेदवारांनी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहान सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी 46 व्या जागतिक स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून देशातील 10000 उमेदवार समाविष्ट झाले होते. या स्पर्धा 15 देशांत 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यावर्षीची जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे.

जागतिक कौशल्य विकास स्पर्धा 2024 आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. जिल्हयात कार्यरत असलेल्या ITIs, Polytechnic, MSME Tools Rooms, CIPET, Engineering College, IHM, Hospitality Institute, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Institute of Jewellery Making, Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील. उमेदवारांना नाव नोंदणी करण्यासाठी 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यांत आली आहे. तरी यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त गणेश पां. चिमणकर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी

महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस

*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस

आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा