You are currently viewing पहिले युवा मराठी साहित्य संमेलन पुण्यात जाहीर 

पहिले युवा मराठी साहित्य संमेलन पुण्यात जाहीर 

पुणे :

राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलन दि. 28 जानेवारी रोजी पुणे येथील आंबेगाव पठारावर कै तुकाराम धोंडीबा कुंजीर विधी महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पुणे केंब्रिज शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ चंद्रकांत कुंजीर यांनी ही माहिती दिली.

राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनात प्रामुख्याने मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा कथाकथन, पुस्तक प्रकाशन, ग्रथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला संमेलन स्वागत समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, सदस्य मयुर कुंजीर, स्मिता कुलकर्णी, स्वीटी सकपाळ, सुजाता निंबाळकर निवेदक रानकवी जगदीप वनशिव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, नवयुगातील युवक व विद्यार्थी यांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी संमेलनाचे आयोजन केले आहे, छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वैभवशाली वारसा लाभलेला पुणे परिसर शिक्षणाचे माहेरघर तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीत हे संमेलन होत असून या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. तसेच कवी कवियत्री निमंत्रित सहभागी मान्यवरांचा संमेलनात सन्मानपत्र शाल ग्रंथ पुष्पहार देऊन गौरविण्यात येईल भोजन व्यवस्था केली असून से सगळे विनामूल्य आहे सहभागी होवू इच्छिणा-या लेखक,कवींनी मो. 9881098481, 8888410330 9011000606 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा