You are currently viewing पेंडूर श्री देव वेताळ मंदिर देवस्थान तीर्थक्षेत्र विकासास जिल्हा वार्षिक योजना पर्यटन विकास २०२३-२४ अंतर्गत ३० लाख निधी मंजूर

पेंडूर श्री देव वेताळ मंदिर देवस्थान तीर्थक्षेत्र विकासास जिल्हा वार्षिक योजना पर्यटन विकास २०२३-२४ अंतर्गत ३० लाख निधी मंजूर

मालवण पेंडूर :

 

जिल्हा नियोजन पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत मौजे. पेंडूर मालवण येथील श्री देव वेताळ मंदिर देवस्थान परिसर जिल्हा वार्षिक योजना पर्यटन विकास २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत तीर्थक्षेत्र विकास करणेसाठी खरारे पेंडूर गावचे सुपुत्र तथा जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ३० लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

सुमारे ३५० वर्ष जुन्या आणि ऐतिहासिक वारसा परंपरा लाभलेल्या श्री देव वेताळ मंदिर देवस्थानास “क” वर्ग’ प्राप्त झाल्यामुळे सदर देवस्थान एक चांगले धार्मिक पर्यटनस्थळ म्हणुन विकसित केले जाईल. त्यामुळे पेंडूर मधील श्री देव वेताळ देवस्थानात पर्यटकांचा ओघ वाढून रोजगार निर्मिती होऊन गावाचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. भविष्यात मंदिर परीसर पूर्णतः विकसित करण्यासाठी देवस्थान कमिटीचे प्रयत्न राहणार आहेत. पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेबाबत देवस्थान कमिटीणने त्यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 2 =