You are currently viewing कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार प्रारंभ…

कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार प्रारंभ…

कणकवली पर्यटन महोत्सवाचा शोभयात्रेने शानदार प्रारंभ…

कणकवली

कणकवली येथील पर्यटन महोत्‍सवाचा प्रारंभ विविध चित्रदेखावे असलेल्‍या शोभायात्रेच्या माध्यमातून झाला. पटकीदेवी मंदिर ते पटवर्धन चौक आणि तेथून उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात शहरातील विविध प्रभागातील मंडळांनी सहभाग घेतला. यात प्रामुख्याने कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.

सायंकाळी पाच वाजता पटकीदेवी मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला या शोभायात्रेच्या प्रारंभी असलेले विविध कार्टून्स, सजलेल्या बैलगाड्या, ढोलपथकांचा निनाद आणि त्‍यानंतर विविध प्रभागातून, शाळांच्या माध्यमातून काढण्यात आलेले चित्ररथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

शोभायात्रेमध्ये कणकवलीचे माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, विराज भोसले, कविता राणे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, महेश सावंत, किशोर राणे, बाळा सावंत, रवींद्र गायकवाड, निखिल आचरेकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पर्यटन महोत्‍सवाच्या प्रारंभी निघालेल्या शोभायात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा आणि कोकणच्या संस्कृतीचे दर्शन विविध मंडळांनी घडवले. दशावतारातील विविध पात्रेदेखील शोभायात्रेमध्ये साकारण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा