*” शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ” —- गणेश तात्या भेगडे , प्रदेशाध्यक्ष – किसान मोर्चा , महाराष्ट्र* .
*किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक*
मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले आहे . मोदीजींच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की , त्यांच्या सर्व निर्णयांचा आणि धोरणांचा केंद्रबिंदू सामान्य माणूस असतो . त्यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य राहीले आहे . त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गेल्या नऊ वर्षांत केलेले काम ऐतिहासिक आहे . त्यामुळेच ” शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ” आहे , असे प्रतिपादन किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी केले .
सिंधुदुर्ग किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारणी बैठक सिंधुदुर्गनगरी येथील ” वसंत स्मृती ” जिल्हा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत , जिल्हा उपाध्यक्ष व किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस राजन चिके , प्रदेश उपाध्यक्ष भाई बांदकर , प्रदेश उपाध्यक्ष – श्री दादा साहेबजी सातव, प्रदेश सचिव – मनोज जी कासवा, ठाणे कोकण किसान मोर्चा संयोजक – डॉ गणेश जी चंदकर, जिल्हा एफ.पी. ओ. संयोजक – श्री बापू पंडीत, जिल्हा उपाध्यक्ष -दिपा काळे मॅडम, जिल्हा सरचिटणीस – श्री गुरुनाथ पाटील व श्री महेश संसारे , जिल्हा चिटणीस – श्री सूर्यकांत नाईक इत्यादी उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले कि , मोदी सरकार च्या काळात शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक निर्णय झाले , यामध्ये शेतमालाची जलद वाहतूक होण्यासाठी किसान रेल्वे सुरु केली , खतांवर ४ लाख कोटींची सबसिडी दिल्यामुळे खतांचे भाव स्थिर राहीले , शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार जमा होऊ लागले , शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट भाव देण्यात आला असे शेतकरी हिताचे निर्णय मोदी सरकारने घेतले .
यावेळी उद्यमशील शेतकऱ्यांचा सत्कार प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये कृषीक्षेत्रात क्रांती करु पाहणाऱ्या एका सर्वसाधारण घरातील व्यक्तीला संशोधनात्मक कामगीरी केल्याबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरीका कडुन कृषीक्षेत्रात मानत डाॅक्टरेट ही पदवी मिळालेले अनंत दिगंबर प्रभु आजगांवकर ,आडेली – वेंगुर्ले यांचा सत्कार करण्यात आला . तसेच आंब्यामध्ये संशोधन करून सलग तीन वर्षे राज्यात प्रथम आंबापेटी पाठवणारे व अमेरिकन युनिव्हर्सिटीची डाॅक्टरेट पदवी व प्राईम अँग्रिकल्चर अवार्ड प्राप्त करणारे उत्तम फोंडेकर , कुंभारमाठ – मालवण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यस्तरीय समितीवर निवड झालेले दिपक भगत , मातोंड – वेंगुर्ले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे यांनी केले .यावेळी वैभव शेणई , प्रफुल्ल प्रभु , संतोष शेटकर , महेश सारंग , किशोर नरे , शंकर तेजम , महादेव सावंत , ज्ञानदेव परब , नारायण शृंगारे , संजय साठेलकर , प्रकाश राणे , जयवंत परब , कीर्तिमंगल भगत, अवधूत नारकर, प्रकाश पांचाळ, रेखा खाडये, पूजा पाटकर, सुहास कामतेकर, सीताराम परब , सूर्यकांत फोंडेकर, अनंत प्रभू आजगांवकर, गीतेश शेणई, प्रकाश शेनई , मकरंद पारकर .
संवाद मीडिया*
*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी
महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस
*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.
*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*