You are currently viewing जिल्हा व्यापारी मेळाव्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण…

जिल्हा व्यापारी मेळाव्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण…

जिल्हा व्यापारी मेळाव्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण…

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण देण्यात आले. यावेळी व्यापारी बांधवांना राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालय तसेच शासनाच्या इतर विभागातील योजनांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन स्टॉल उभारण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी महासंघातर्फे मंत्री चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी रोजी मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होत आहे. यंदा यजमान मालवण व्यापारी संघाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्षही आहे. याचे औचित्य साधून २७ ते ३० जानेवारी या कालावधीत व्यापार व पर्यटन प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या एकजुटीचे प्रतीक म्हणून साजरा होणाऱ्या या व्यापारी एकता मेळाव्याला सिंधुदुर्गचे पालकमंत्री या नात्याने प्रमुख मान्यवर निमंत्रित म्हणून प्रत्यक्ष सहभागी होऊन व्यापारी बांधवांना संबोधित करावे, अशी विनंती महासंघातर्फे चव्हाण यांना करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी मेळाव्यासंदर्भात चर्चा केली. तसेच मेळाव्यात व्यापारी महासंघातर्फे करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात आपण निर्णय घेऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले. व्यापार वाढीसंदर्भात आणि आवश्यक सुविधांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, राजन नाईक, संजय भोगटे, महेश नार्वेकर, मालवण शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, परशुराम पाटकर, नितीन वाळके, हर्षल बांदेकर, खजिनदार गणेश प्रभुलकर, विजय केनवडेकर, सहसचिव अभय कदम, सरदार ताजर, अमोल केळुसकर, हरेश देऊलकर, अखिलेश शिंदे, संभव कुडाळकर, राजेश पारकर, अमित कारेकर, नाना साईल, अरविंद ओटवणेकर, नितीन तायशेट्ये, प्रसाद धारगळकर, कुलराज बादेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 4 =