मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नवी मुंबई केंद्रावर ८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे प्राथमिक फेरीमध्ये नवी मुंबई जिल्ह्यातून एकूण ३१ नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
सोमवार ८ जानेवारी रोजी स. १० वा. ये रे ये रे पावसा, लेखक: संध्या कुलकर्णी, दिग्दर्शक: अरविंद सरफरे, अनुराग, कल्याण, स. ११:१५ वा.गणपती बाप्पा हाजीर हो, लेखक: धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक: हर्षद पाटील, अमॅच्यूअर थिएटर, नागोठणे, दु. १२:३० वा. मुंग्यांची दुनिया, लेखक: मकरंद जोशी, दिग्दर्शक: राजेश राणे, ज्ञानदीप कलामंच, ठाणे, दु. १:४५ वा. एका चित्राची गोष्ट, लेखक: अरविंद लिमये, दिग्दर्शक: राजन पांचाळ, अनंत सांस्कृतिक आणि सामाजिक कलामंच, दु. ३ वा. जीर्णोद्धार, लेखक: संध्या कुलकर्णी, दिग्दर्शक: दीपक चिपळूणकर, कल्याण तालुका शिक्षण सामाजिक शैक्षणिक संस्था, सायं. ४:१५ वा. मदर्स डे, लेखक: धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक: विजय घुले, अश्वमेघ, कल्याण, सायं ५:३० वा. स्वामी, लेखक: निलेश गोपनारायण, दिग्दर्शक: दीपाली दांडगे, आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल.
मंगळवार दि. ९ जाने. स. १० वा. लास्ट किस, लेखक व दिग्दर्शक: प्रेम जाधव, ज्ञानमैत्री सामाजिक व शैक्षणिक संस्था, कल्याण, स. ११:१५ वा. बँक ऑफ बालपण, लेखक: प्रदीप ढवळ, दिग्दर्शक: शंकर धुलगुडे, गंधार कला संस्था, दु. १२:३० वा. जंगलाची शाळा, लेखक व दिग्दर्शक: नितेश डोगरे, गर्जा प्रतिष्ठान, मुरबाड, दु. १:४५ वा. अ-फेअर, लेखक: विनोद गायकर, दिग्दर्शक: वृषांक कवठेकर, गुरुकुल द डे स्कूल, दु. ३ वा. काय ते जाणावे, लेखक: अमरजित आमले, दिग्दर्शक: उल्हास रेवडेकर, डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, न्यू पनवेल, सायं. ४:१५ वा. जा रे जा, सारे जा, लेखक: संदीप गचांडे, दिग्दर्शक: करिश्मा वाघ, मुक्तछंद नाट्यसंस्था, ठाणे
बुधवार दि. १० जाने. स. १० वा. किट्टी, लेखक: सागर पवार, दिग्दर्शक: नीलम पवार, निमकर आर्टस, डोंबिवली, स. ११:१५ वा. पाणी, लेखक: कविता मोरवणकर, दिग्दर्शक: आशुतोष वाघमारे, नूतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण, दु. १२:३० वा. चिमणी उडाली भुर्रर्र, लेखक: संदीप गचांडे, दिग्दर्शक: बाळकृष्ण ओडेकर, प्रेरणा कला संस्था, दु. १:४५ वा. टोल, लेखक: शहाबाज गोलंदाज, दिग्दर्शक: प्रीती जाधव, रंगमित्र सांस्कृतिक कलामंडळ, इंदापूर- रायगड, दु. ३ वा. आस्मा के उस पार, लेखक व दिग्दर्शक: दीपक पवार, रंगरचना कलामंच, पनवेल, सायं. ४ वा. सेज तुका, लेखक: मधुरा ओक, दिग्दर्शक: श्रुती गणपुले, रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ, सायं ५:३० वा. को म की का, लेखक व दिग्दर्शक: सुरेश शेलार, सेक्रेड हार्ट स्कूल, वरप, कल्याण.
गुरुवार दि. ११ जाने. स. १० वा. भिंगरी, लेखक: मिलिंद खरात, दिग्दर्शक: श्रीकांत भगत, समर्थ भारत संस्था, अंबरनाथ, स. ११:१५ वा. आनंदी, लेखक व दिग्दर्शक: चेतन दिवे, समर्थ विद्यालय, दु. १२:३० वा. वेदनेचा मौन स्वर, लेखक व दिग्दर्शक: चेतन पवार, सम्राट फाऊंडेशन, दु. १:४५ वा. आईचा श्याम, लेखक व दिग्दर्शक: माधवी राणे, श्री आवाज संस्कृती फाऊंडेशन, दु. ३ वा. बाप्पा रॉक मुलं शॉक, लेखक व दिग्दर्शक: सुशील शिरोडकर, श्री मंगेशी धाम टॉवर्स को. ऑ. हौ. सो. लि., सायं. ४:२५ वा. शेपूट राहिलं, लेखक व दिग्दर्शक: प्रशांत निगडे, शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था, नवी मुंबई, सायं. ५:३০ वा. अधांतरी आकांत, लेखक: समीर पवार, दिग्दर्शक: सागर पवार, सृजन प्रतिष्ठान, वाशिंद.
शुकवार दि. १२ जाने. स. १० वा अफलातून टोळी, लेखक व दिग्दर्शक: संगीता पाखले, उदय शिक्षण प्रसारक मंडळ, स. ११:१५ वा. मदर्स डे, लेखक: धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक: रश्मी जंगम, सुहासिनी नाट्य धारा, महाड, दु. १२:३० वा. आदिम, लेखक: गोविंद गोडबोले, दिग्दर्शक: रश्मी घुले, झपुर्झा, दुपारी १:४५ वा. कलर, लेखक: सागर लोधी, दिग्दर्शक: सुरेश मढ़े, सचपंदन नाट्यकला क्रीडा शैक्षणिक मंडळ, रोहा हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य बालनाट्य स्पर्धा संपन्न होणार असल्याचे विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी नमूद केले. प्रवेश विनामूल्य असलेल्या तसेच दरवर्षी जल्लोषात संपन्न होणार्या बालरंगकर्मींचा सोहळा समजल्या जाणार्या या स्पर्धेस नेहमीच नवी मुंबईकर रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी सदर स्पर्धेस जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आले आहे.