You are currently viewing सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघटनेच्या कुडाळ शाखेचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या शुभहस्ते

सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघटनेच्या कुडाळ शाखेचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या शुभहस्ते

कुडाळ तालुका सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दादा साईल यांची निवड

 

कुडाळ :

 

आज कुडाळ आगार येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या शुभहस्ते  सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघटनेच्या कुडाळ शाखेचा शुभारंभ आणि संघटनेच्या अधिकृत नामफलकाचे अनावरणचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून भाजपाचे अभ्यासू आणि युवा नेतृत्व तथा मंडल अध्यक्ष दादा साईल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कुडाळ आगारातील कर्मचाऱ्यांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी या संघटनेच्या सर्व नूतन पदाधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कामगार संघटनेचे नेते अशोक राणे संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, प्रदेश महिला कार्यकारणी सदस्य दीपलक्ष्मी पडते, जिल्हा कार्यकारीणी सदस्य राजू राऊळ, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडळाचे अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य पप्या तवटे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश नाईक, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष रुपेश कानडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, शक्तीकेंद्र प्रमुख नागेश परब, कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक चांदणी कांबळी, निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, आबा धडाम, अशोक कंदुरकर, कैलास यादव, प्रकाश पावसकर, योगेश घाडी, सुनील गायकवाड तसेच कुडाळ आगारातील एसटी कर्मचारी दिनेश शिरवलकर, राजेंद्र वंजारे, मिथुन बांबुळकर, प्रशांत गावडे, विनायक प्रभू, संजय हुमरमळेकर, समीर कदम, अरुण कदम, एस बी वरक, तुषार गवंडे, स्नेहल सोनवडेकर, हरी करलकर, सचिन लाड, प्रदीप तेरसे, अविनाश कुडाळकर, ए ए दळवी आदी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा