You are currently viewing सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडीत उद्या शिवरत्न शेटेंचे व्याख्यान…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडीत उद्या शिवरत्न शेटेंचे व्याख्यान…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडीत उद्या शिवरत्न शेटेंचे व्याख्यान…

सावंतवाडी

येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ७ व्या शिवजागराच्या निमित्ताने उद्या सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.
स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. या गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेतील तामिळनाडूतील ‘जिंजी पावेतो’ वरील महाराजांचा दक्षिण दिग्वीजयाचा अजरामर पराक्रम समजून घ्यावा तितका थोडाच वाटत जातो. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत महाराजांनी १६७७-७८ च्या दरम्यान तंजावर पावेतो जिंकलेला मुलुख ही महत्त्वाची घटना होती. महाराजांचा हा दक्षिण दिग्विजय किती दूरदर्शी होता याची साक्ष छत्रपतींच्या पश्चात मराठा साम्राज्याला आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हाच जिंजी किल्ला छत्रपती राजाराम महाराजांना आश्रयाला उपयोगी पडला. त्यांनी या किल्ल्यावरून मराठ्यांची राजधानी तब्बल ८ वर्षे चालवली.
छत्रपतींचा इतिहास समजून घेताना हा दक्षिण दिग्विजय फारसा प्रकाशात आला नसल्याचे दिसते. पण हा इतिहास महाराजांच्या पराक्रमांचे रोमांचकारी पैलू सांगणारा आहे. या मोहिमेचे यथार्थ वर्णन महाराजांच्या दक्षिणेतील पराक्रमाच्या तेजस्वी पाऊलखुणा, यातील बारकाव्यासह त्यांच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ही शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. ती ऐकण्यासाठी अवघ्या रयतेने यावे, असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕

*माई ह्युंदाई*

*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢

*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*

*MAI HYUNDAI*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फोन : 9623245800*

*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121183/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा