You are currently viewing साटेली तर्फ सातार्डे येथील मायनींग विरोधी लढ्याला आमचाही पूर्ण पाठिंबा

साटेली तर्फ सातार्डे येथील मायनींग विरोधी लढ्याला आमचाही पूर्ण पाठिंबा

*साटेली तर्फ सातार्डे येथील मायनींग विरोधी लढ्याला आमचाही पूर्ण पाठिंबा*

*आरोस येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार नाईक, नंदू परब, प्रविण आरोसकर,यांची माहिती*

तर साटेली तर्फ सातार्डे येथील ग्रामस्थांना मायनिंग संदर्भात होत असणाऱ्या त्रासाबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांचे लक्ष वेधणार व पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार.

मागील कित्येक वर्षे बंद असलेले साटेली तर्फ सातार्डा येथील मायनिंग पुन्हा सुरू झाल्यामुळे साटेली गावातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही ग्रामस्थांच्या जमिनीतून अतिक्रमण करून रस्ता तयार केला असून त्या जमिनमालकांना मायनिंग संबधीत काही व्यक्तींकडून दमदाटी केली जात आहे.तर मधे मध्ये मायनिंग समर्थक व ग्रामस्थ यांच्यात वाद होऊन मारामारी सारखे गुन्हे घडत आहेत.
त्यावबरोबर मायनिंग वाहतूक करणारे ट्रक भरधाव चालत असल्याने अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो,
त्याचप्रमाणे साटेली गावात जर मायनिंग परत सुरू झाले तर या गावात सुद्धा माळीन सारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही. आज साटेली येथील बहुतांश लोक हे काजू , नारळ, सुपारी उत्पन्नावर अवलंबून आहेत. या गावात मायनिंग सुरू झाल्यामुळे पाण्याची पातळी अगोदरच खाली गेली असून फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याच दुर्बीक्ष जाणवत असते.
मायनिंग मुळे गावातील रहिवाशांना एवढा त्रास होऊनही हे मायनीग कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ? या ठिकाणचे स्थानिक आमदार श्री दिपक केसरकर हे याविषयावर काहीच बोलत नाहीत. की या आमदाराना फक्त निवडनुका पूर्तीच गावातील रहिवाशांची आठवण येते का ? त्याच बरोबर मायानिंग संबंधी सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प का आहे. की सरकारला सुद्धा या गावातील रहिवाशांच्या जीवनाशी काही देणं घेणं लागत नाही का ?
आज आपल्या जमीन व जीव ओतून लागवड केलेल्या उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी या लोकाना रस्त्यावर उतरण्याची पाळी लोकांवर यावी हे या ठिकाणच्या स्थानिक आमदारांच अपयशआहे व ज्यानी विश्वास ठेवून आपल्या प्रगतीसाठी आपल बहुमूल्य मत घालून आमदार म्हणून निवडून दिलं त्या साटेली ग्रामस्थांच दुर्दैव आहे.

जर या मायणींग संदर्भात लवकरात लवकर निर्णय होऊन गावातील रहिवाशांना योग्य न्याय मिळाला नाही तर या मायनिंग विरोधात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम (जिजी) उपरकर यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली साटेली तर्फ सातार्ड गावातील रहिवाशांसाठी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल व प्रसंगी न्याय मिळवण्यासाठी हरित लवाद व न्यायालयात जाण्याचा इशारा
सामाजिक कार्यकर्ते मंदार नाईक , नंदू परब, प्रविण आरोसकर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =