You are currently viewing मनात असेल तर– कळसुबाई!

मनात असेल तर– कळसुबाई!

*मनात असेल तर– कळसुबाई!*

‘ हे काही मला जमेल असे वाटत नाही!’ या वाक्यातूनच एक प्रकारची निगेटिव्हिटी तयार होते आणि ती सर्व मनाचा ताबा घेते. पण जर मनानेच ठरवलं मला शक्य आहे , मी शक्य करू शकतो , मला नक्कीच जमेल, तर मग काय? अशक्य गोष्ट सुद्धा सहज शक्य होऊन जाते. मनाचा ताबा संपूर्ण शरीरावर तयार होतो आणि मग शरीर ती गोष्ट साध्य करण्यासाठी सक्षम बनते. मनाचे सामर्थ्य हे सद्यस्थितीत असलेल्या शारीरिक सामर्थ्याच्या नऊपटीने जास्त आहे. शरीर कितीही कमकुवत असू दे, जर मनाने ठरवलं तर कळसुबाई सुद्धा शक्य आहे.

लहान असताना मी कळसुबाई अगदी पायथ्याशी जाऊन पाहिली होती. पण ट्रेक करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मात्र देण्यास कुणीच तयार नव्हते. तेव्हापासूनची एक इच्छा मनात होती कळसुबाई ट्रेक करायचीच. पण योग म्हणा किंवा वेळ तशी जुळून येतच नव्हती. मन मात्र सतत कळसुबाईकडे ओढावत होते. सोबत यायला मात्र कुणी तयार होईना. मनातली इच्छा मनातच रेंगाळत होती. पुस्तकात कळसुबाई बद्दल वाचलं होतं. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील कळसुबाई, 5400 फूट उंचीचे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; कळसुबाई म्हणजे जणू काय महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखरच!

कळसुबाई सर करण्याची इच्छा मनात रेंगाळत , असतानाच 2006 मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करत असताना कुत्रा आडवा आल्याने माझ्या मोटरसायकलचा अपघात झाला. माझ्या उजव्या पायाला फार गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. पुढे हे पायाचे दुखणं बळावत गेलं. त्यात माझाही पायाकडे दुर्लक्ष झाला. पुढील दहा वर्षात पायाची गुडघ्यातून प्रचंड झीज झाली. चालताना कोल्हापुरी चपलांचा जसा आवाज यावा तसा गुडघ्यातून आवाज येऊ लागला. चालताना मध्येच पडू लागलो. गुडघ्यातून पाय अगदी सैल होऊन गेला होता. अपघातानंतर सुमारे अकरा वर्षानंतर म्हणजे 2017 मध्ये माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर सर्जरी झाली. त्यातून बरे होणे फारच कठीण गोष्ट वाटत होती. सुरुवातीला काही दिवस कुबडी, तर पुढे वॉकर आणि त्यानंतर हळूहळू काठीच्या सहाय्याने चालू लागलो. चालण्याचा दैनंदिन व्यायाम चालूच ठेवला. पायाचा व्यायाम सातत्याने सुरू केला आणि त्यामुळे पायाची ताकद हळूहळू पुनः प्राप्त झाली.

पायी प्रवास करण्याची आवड असल्याने सर्जरीनंतर सहा महिन्यात वैष्णोदेवीचा 15 किलोमीटरचा प्रवास पायी केला आणि मनोबल वाढत गेले. तत्पूर्वी मनोहर संतोषगड, रांगणागड, रायगड असे गड-किल्ले ट्रेक केले होते. हळूहळू सायकलिंग कडे वळू लागलो. सायकलिंगचा सराव चालू ठेवला. अगदी दिवसभरात 150 किलोमीटर सायकलवरून प्रवास करू लागलो. सायकलिंगच्या सरावाने पायातील स्नायूंची ताकद वाढत गेली. मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वयाएवढे किलोमीटर सायकलिंग करून त्यांना शुभेच्छा देण्यात मला आनंद मिळू लागला आणि वाढदिवस असणाऱ्या मित्रांना सुद्धा आनंद मिळू लागला. यातून शारीरिक फायदा मात्र मलाच प्राप्त होत असे. यासर्व गोष्टी करत असताना कळसुबाई मात्र मनात घर करुन होती.

” पप्पा! मित्रांच्या वाढदिवसाला त्यांच्या वयाएवढे सायकलींग करता, मग माझ्या वाढदिवसाला काय विशेष करणार? ” माझी मोठी मुलगी स्वीटी एकदा मला म्हणाली. ” अगं! तुझ्यासाठी तर कळसुबाईच!” मी सहज बोलून गेलो. 25 डिसेंबर ख्रिसमस , तिचा वाढदिवस; मी मनातठरवून टाकलं, यावर्षी तिच्या वाढदिवसाला आपण कळसुबाई ट्रेक करायचं आहे!

विवेक देशमुख हा माझा बी.एड. चा वर्गमित्र आहे. तो उत्तम ट्रेकर आहे. बरेच गड-किल्ले त्यांनी ट्रेक केले आहेत. दररोज तो आठ ते दहा किलोमीटरची धाव सहज पूर्ण करतो. मला एकदा म्हणाला, ‘ चल आपण कळसुबाई ट्रेक करायची का ? ‘ त्याच्या बोलण्याला मी होकार दिला. तसा यापूर्वी कळसुबाई शिखर ट्रेक करण्याचा एप्रिल 2023 मध्ये आम्ही एक प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न निष्फळ ठरला. प्रखर उष्णतेमुळे शिखर वर चढून जाणे फारच मुश्किल झाले. अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची भीती जास्त वाटत होती. त्यामुळे अशा परिस्थितीत कळसुबाई ट्रेक करण्याचा निर्णय आम्ही बदलला. तात्काळ विवेकने सिंहगड ट्रेक करायचा निर्णय घेतला. आम्ही सर्वजण तयार झालो. दुसरे दिवशी सिंहगड ट्रेक केला, परंतु तिथेही तीव्र उष्णतेच्या तडाख्याने आणि सतत निघणाऱ्या घामाच्या धारांमुळे आम्ही फार हैराण झालो. आमची दमछाक झाली पण त्याही परिस्थितीत आम्ही सिंहगड पूर्ण केला.

माझे बी. एड. चे इतर वर्गमित्र – प्रकाश, मिलन, येसू, शरद , कुसुम, श्रेयस , संजय आणि स्वतः विवेक अशी नऊ जणांची टीम तयार झाली. आम्ही सर्वजण पन्नाशी ओलांडलेले तरुण ; आम्ही सकाळी आठ वाजता बारी गावातून कळसुबाई ट्रेकला सुरुवात केली. सोबत पाणी बॉटल, बिस्किट, गोळ्या यांचा साठा घेऊन गप्पा- टप्पा मारत हळूहळू कळसुबाईच्या टोकाकडे कूच केली. कधी बसत, कधी धापा टाकीत तर कधी काठीचा आधार घेत; दगड -धोंडे असलेल्या खडकाळ भागातून, उन्हाचा तडाखा पाठीवर झेलत, आम्ही दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कळसुबाईच्या सर्वात उंच टोकावर जाऊन पोहोचलो. सर्वजण दमलेलं होते, तरीसुद्धा कळसुबाई चढून केल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. महाराष्ट्रातील अगदी उंच ठिकाणी, समुद्री सपाटीपासून 5400 फूट उंचीवर, महाराष्ट्राचे एव्हरेस्टवर चढण्याचा आनंद होता. सर्वजण दमलेले, थकलेले असताना देखील कळसुबाई सर केल्याच्या आनंदामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर ताजेपणा होता. ‘ हर – हर – हर म हा देव ‘ ची आरोळी प्रकाशने ठोकलेली आणि त्याला सोबत करणारा आमच्या कोरसमुळे आसमंतात दुमदुमून गेला. विवेकने आम्हाला ठाणे, नाशिक व अहमदनगर या तीनही जिल्ह्याची बॉर्डर दाखवली. तीनही जिल्ह्यांना जोडणाऱ्या उंच भागावर, आम्ही पाय घट्ट रोऊन उभे होतो. कळसु आईच्या दर्शनाने आम्ही पावन होऊन, तिला दिलेल्या नारळाच्या खोबऱ्याचा प्रसादावर आम्ही मेजवानी सारखा ताव मारला आणि कळसुबाई शिखर उतरण्याचा निर्णय घेतला.

कळसुबाई शिखर उतरतानाचा प्रवास मात्र फारच दमछाक करणार होता. वाटा निसरड्या होत्या. बऱ्याच वेळा पाय घसरत असे. बूट मातीत आणि दगडावर टिकत नव्हते. मी तर तब्बल तीन वेळा चांगलीच लोटांगणे घातली. कळसुबाई शिखर चढताना सरसर खारुताईसारखा पुढे पुढे पळणारा आमचा वजनाने हलका असणारा मित्र येसू उतरताना मात्र चांगला जेरीस आला होता. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला इंज्युरी झाल्याने, त्याला कुर्मगतीने मार्गक्रमण करावे लागत होते. सकाळी कळसुबाईची सुरुवात पोह्याच्या एका डिशने केली होती, आता मात्र सर्वांच्याच पोटात भुकेच्या आग डोंब उसळला होता. पायथ्याशी असणाऱ्या एका घरवजा हॉटेल मध्ये आम्ही सर्वजण विसावलो. अंगणात आमची पंगत छान बसली. गरम भाकरी असलेल्या जेवणावर यथेच्छ ताव मारून आम्ही आमची पुढील सफर सुरू केली. तासाभराच्या प्रवासानंतर अगदी सहा वाजण्याच्या सुमारास आमचा लावजमा पुनश्च एकदा बारी गावात अवतरला. चहुकडे अंधार दाटून आला होता. सर्वजण थकलेले होते.

या सर्व प्रवासात मिलनचे कौतुक करावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल. तिला चालण्याचा जरा सुद्धा सराव नव्हता. फक्त आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ती आमच्या मोहिमेत सामील झाली होती. ‘ मला तर पाय नसल्यासारखं वाटतय ‘ हे तिचे शब्द आमच्या मनात भीती निर्माण करणारे होते. याचा त्रास तिला आज नाही परंतु उद्या नक्कीच जाणवणार आहे हे आम्हाला माहीत होते. परंतु होणाऱ्या त्रासापेक्षा कळसुबाई सर केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर द्विगुणीत होऊन दरवळत होता.

परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी मी विवेकला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो ‘ थँक्स मित्रा! तुझ्यामुळेच तर माझी कळसुबाई वारी पूर्ण झाली. ‘ विवेकने माझे दोन्ही हात घट्ट पकडले आणि मला हलकेच हलवून म्हणाला, ‘चल यार! पुढच्या वेळी राजगड नक्कीच!’

—— अविनाश मांजरेकर

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 15 =