You are currently viewing कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स(water sports)व्यवसाय सुरू करण्यासाठी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स(water sports)व्यवसाय सुरू करण्यासाठी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

– खासदार विनायकजी राऊत

मा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. नाम.उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना लोकसभा गटनेते, शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत यांनी भेट घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स(water sports)सुरू करण्यासंदर्भात मागणी केली.कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड या तिन्ही जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स (water sports)व्यवसायावर हजारोच्या संख्येने उपजीविका करणारे तरुण आहेत.आता खूप मोठ्या प्रमाणात देशातील पर्यटक कोकणात आले आहेत आणि येतही आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांचे वॉटर स्पोर्ट्स(water sports)हे प्रमुख आकर्षण असल्याने मागील दहा महिने कोरोनाच्या उपद्रवामुळे वॉटर स्पोर्ट्स(water sports) व्यवसाय बंद आहेत, ते अद्यापही सुरू झालेले नाहीत.परिणामी लाखो रुपयांची कर्ज घेऊन वॉटर स्पोर्ट्स(water sports)चालविणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्याचप्रमाणे कर्जाचे हप्ते न भरल्याने बँका जप्तीच्या कारवाया करीत आहेत.वॉटर स्पोर्ट्स(water sports) ला मंजुरी मिळावी म्हणून मेरीटाईम कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली असल्याचे समजते. तरी सर्व नियमांचे पालन करून कोकणातील वॉटर स्पोर्ट्स(water sports) सुरू करण्याचे आदेश आपण संबंधित जिल्हाधिकारी यांना द्यावेत. अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.नाम. उद्धवजी ठाकरे यांचे कडे खास.विनायक राऊत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा