You are currently viewing केपटाऊनमध्ये विकेट्सची झुंबड, दिवसातून दोनदा तीन खेळाडू बाद

केपटाऊनमध्ये विकेट्सची झुंबड, दिवसातून दोनदा तीन खेळाडू बाद

*सामना दुसऱ्या दिवशी संपण्याची शक्यता*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला ५५ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघ मोठी आघाडी घेताना दिसत होता. भारताने १५३ धावा केल्या होत्या आणि त्याच्या सहा विकेट्स शिल्लक होत्या. विराट कोहली आणि केएल राहुलसारखे दिग्गज विकेटवर होते, पण इथे लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी एकही धाव न देता ११ चेंडूंत सहा विकेट घेतल्या. भारतीय संघ १५३ धावांत आटोपला आणि पहिल्या डावात केवळ ९८ धावांची आघाडी घेऊ शकला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही धाव न काढता संघाच्या सहा विकेट पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्यूलँड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी अडचणीची ठरली. पहिल्याच दिवशी २३ विकेट पडल्या. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात तीन विकेट गमावत ६२ धावा केल्या आहेत.

या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व इतके होते की पहिल्या डावात केवळ दोन फलंदाज आणि दुसऱ्या डावात तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. सामन्याच्या तिसऱ्या डावातही दोन खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर, टोनी डीजॉर्ज आणि ट्रिस्टन स्टब्स, जो पहिला कसोटी सामना खेळत होता, ते दिवसभरात दोनदा बाद झाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताकडे ३६ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद करून तिसऱ्या सत्रापूर्वी सामना संपवण्याची शक्यता आहे.

आपला शेवटचा कसोटी सामना खेळत असलेल्या डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला माहीतही नव्हते की, येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी मोठी अडचण ठरणार आहे. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले. सिराजने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्करामला (२) स्लिपमध्ये झेलबाद केले. पुढच्याच षटकात त्याने एल्गरला (४) त्रिफळाचीत केले. १५ धावांच्या आत आफ्रिकेने ४ विकेट गमावल्या. बेडिंगहॅम (१२) आणि व्हेरिन (१५) यांनी १९ धावा जोडल्या, मात्र सिराजने या दोघांनाही बाद केले. शार्दुलच्या जागी खेळायला आलेल्या मुकेश कुमार आणि बुमराह यांनी उपाहारापूर्वी आफ्रिकेचा डाव ५५ धावांवर संपुष्टात आणला. पहिल्या कसोटीत ह्याच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३२ धावांनी विजय मिळवला हे लक्षात घ्यावे लागेल.

सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा भारताविरुद्ध शतकापेक्षा कमी धावा करून बाद झाली. हा संघ २०१५ मध्ये नागपुरात ७९ आणि २००६ मध्ये जोहान्सबर्गमध्ये ८४ धावांवर बाद झाला होता. भारताविरुद्ध १०० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद होण्याची ही कसोटी इतिहासातील ११वी वेळ होती. भारताने आफ्रिकन संघाला २३.२ षटकांत बाद करून कोणत्याही संघाला कमी चेंडूत बाद करण्याचा विक्रम मोडीत काढला. याआधी त्यांनी २००६ मध्ये जोहान्सबर्ग येथे आफ्रिकेचा २५.१ षटकांत डाव संपवला होता. दक्षिण आफ्रिकेच्या डावात केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

भारतीय डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. यशस्वी (०) रबाडाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला, पण रोहितने झटपट धावा केल्या. भारताने अवघ्या ९.४ षटकांत आफ्रिकन धावसंख्या ओलांडली. रोहितने गिलसोबत ५५ धावांची भागीदारी केली. रोहित ३९ धावा करून बर्गरचा बळी ठरला. गिलने विराटसोबत ३३ धावांची भागीदारी केली, मात्र बर्गरने त्यालाही ३६ धावांवर बाद केले. यानंतर बर्गरने श्रेयसलाही (०) बाद केले. चहापानापर्यंत भारत चार विकेट्सवर १११ धावांवर मजबूत स्थितीत होता. कोहली २० आणि राहुल ० धावांवर खेळत होते.

चहापानानंतर कोहली आणि राहुलने धावसंख्या १५३ धावांपर्यंत नेली. प्रथम नागिदीने राहुलला (८) बाद केले. त्यानंतर त्याच षटकात त्याने अश्विनच्या जागी खेळत असलेल्या रवींद्र जडेजा (०), जसप्रीत बुमराह (०) यांना बाद केले. रबाडाने पुढच्याच षटकात कोहलीला (४६) बाद केले. यानंतर सिराज धावबाद झाला. पुढच्याच चेंडूवर त्याने प्रसिध कृष्णाला बाद केले आणि डाव १५३ धावांवर गुंडाळला. रबाडा, नागिडी, बर्गर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

आफ्रिकेला एकाच दिवसात दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली आणि कर्णधार डीन एल्गरची फलंदाज म्हणून कसोटी कारकीर्द पहिल्याच दिवशी संपुष्टात आली. एल्गर आणि मार्कराम यांनी दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ३७ धावांची भर घातली, मात्र १२ धावा केल्यानंतर एल्गर मुकेशच्या चेंडूवर बाद झाला. त्याने पहिल्या डावात ४० धावा केल्या होत्या. तंबूमध्ये परतताना कोहलीने एल्गरला मिठी मारली. बहुतेक भारतीय खेळाडूंनी त्याच्याकडे पाठ फिरवली. संपूर्ण स्टेडियम आणि आफ्रिकन ड्रेसिंग रुम त्याच्या स्वागतासाठी उभी राहिली.

 

 

*संवाद मिडिया*

 

*Job Vacancy !! Job Vacancy !!*👩🏻‍💻🧑‍💻👨‍💻

 

*सविस्तर वाचा 👇*

————————————————–

😇 *LIFE GOALS DONE*😇

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

 

🧑‍💻👩🏻‍💻 *Job Vacancy*👩🏻‍💻🧑‍💻

 

▪️Part Time / Full Time

▪️Earn Extra Income

▪️Post – Agency Sales Officer

▪️Qualification – 12th Above

▪️Fix Salary – 30,000/- ▪️Work Day / Training / Support Provided

▪️Employees / Housewife / Retired Person / Businessman / Professionals

 

📱Branch Head – 8087757388, 8550934448

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

🏢 Job Location – Sawantwadi

🏢 Branch Office – Mapusa, Goa

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा