You are currently viewing भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी केली कार्यकारिणी जाहीर

कुडाळ
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी जाहीर केली. भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संपूर्ण ओबीसी मोर्चा बांधणीची धुरा दीपक नारकर यांच्याकडे सोपवली होती. नारकर यांनी ही जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली ती पुढील प्रमाणे-
कुडाळ महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी दीपलक्ष्मी पडते, कणकवली युवक जिल्हाध्यक्षपदी महेश शाहू गुरव, सावंतवाडी उपाध्यक्षपदी विकास ज्ञानदेव केरकर, दोडामार्ग तालुका उपाध्यक्षपदी सुभाष सखाराम नार्वेकर, वेंगुर्ला तालुका सरचिटणीसपदी मनोहर बापू खानोलकर, वैभववाडी तालुका सरचिटणीसपदी प्रकाश कृष्णा माईनकर, सावंतवाडी तालुका चिटणीसपदी उदय एकनाथ धुरी, कुडाळ तालुका चिटणीसपदी सचिन तेली यांची निवड करण्यात आली असून जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी प्रकाश मनोहर पांचाळ-वैभववाडी, शरद सहदेव मेस्त्री-वेंगुर्ला, प्रशांत तळवणेकर- सावंतवाडी, समीर दिगंबर हळदणकर-कुडाळ यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा