You are currently viewing माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांना मातृशोक…

माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांना मातृशोक…

माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांना मातृशोक…

सावंतवाडी

सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी जयश्री जयकांत पेडणेकर ( ८६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस बेलापूर नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी १ वाजता सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निःसीम विठ्ठल भक्त असलेल्या जयश्री पेडणेकर यांनी गेली अनेक वर्षे कै. भाऊ मसुरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात नित्य आराधना केली होती. अलिकडे वयोमानानुसार त्या भटवाडी विठ्ठल मंदिरात जात असत. अलिकडील काही वर्षात त्या अल्पशा आजाराने ग्रस्त होत्या. त्यासाठीच महिनाभरापूर्वी त्यांना नवी मुंबई बेलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे देहावसान झाले.
अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभाव असल्याने अनेकजण आई म्हणूनच संबोधत असत. आपल्या स्वभावाने सर्वांना त्या आपल्याश्या करायच्या. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी त्यांचे पार्थीव त्यांच्या भटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात येणार असून दुपारी १ नंतर त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात ३ मुलगे, २ मूली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर व पेडणेकर सायकल कंपनीचे मालक चंद्रशेखर पेडणेकर व अरुण पेडणेकर यांची ती आई तर शरद पेडणेकर यांची आज्जी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 11 =