You are currently viewing जात्यावर दळताना

जात्यावर दळताना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*जात्यावर दळताना*

 

कोंबडा आरवताच पहाटेच्या अंधुकशा उजेडात…

ती जागी होते…प्रातःकर्म उरकताच….भलं मोठं दगडी जातं……तिला खुणावत असतं……

कधी पक्कं रोवलेलं तर कधी मऊसूत लुगड्याच्या चौपदरी घडीवर……ते जातं तिचा पहाट मित्र जणू….

जातं फडक्याने स्वच्छ पुसून..

ती जड पाळू जात्यावर ठेवते..

लाकडी खुंटी पक्कीच, तरी अजून छोट्या दगडाने ठोकून ..

मजबूत करते…टोपलीत जोंधळे घेऊन आता ती डोक्यावरचा पदर सावरत दळायला जमीनीवर बसते….एक पाय दुमडून एक पाय पसरून….

डाव्या हाताने मूठभर धान्याचा घास जात्यात टाकत ती जातं ओढू लागते….घरघर घरघर आवाजाची लय…आणि पांढरं शुभ्र पीठ जात्याच्या खाली गोलाकार पडू लागतं….आपोआप एक लय तयार होते…जातं ,पीठ आणि तिच्या हातच्या काकणांची….

आणि दळतादळता ती विचारात मग्न होते…माहेर सासरच्या सर्व कडूगोड आठवणी जात्याच्या लयीसोबतच फेर धरू लागतात.आणि जात्यातील पिठाप्रमाणेच मुखातून भावभावना ओव्या होऊन बाहेर पडू लागतात…..गोड मधुर नाद..जात्याच्या लयीत..बेमालूम मिसळून जातो.

पिठाबरोबर मनातील दुःख..व्यथा वेदना मनातून भरडून निघतात….ती दळतच रहाते..भावभावनांचं दळण..

कधी उद्याची स्वप्न तर कधी जोडीदाराचं वैभव…

ती बोलत असते जात्याशी…ते जाणतं जणू तिचं ह्रदय…तिचा आत्मा…..ती आपल्याच तंद्रीत..

आणि टोपलं रिकामं झालेलं…

संपलंही दळण..काही वाटलंच नाही…किती सहजपणे……

ती जात्याच्या चारी बाजूचं पीठ डब्यात भरते…घर्षणाने तापलेलं

पीठ तसंच चुलीपुढे ठेवते….पुन्हा जातं पुसते आणि .पीठ झटकतानाच मनावरचंही ओझं झटकून टाकते…….

आता ती शांत चित्तानं ,प्रसन्न मुद्रेनं दैनंदिन कामाला लागते……

सोनसळी किरणं नुकतीच हसत धरेवर पसरत असतात…..जात्यावर आणि तिच्या मनावर…..!

 

००००००००००००००🌸🍃

अरुणा दुद्दलवार@✍️

 

*संवाद मिडिया*

 

*Job Vacancy !! Job Vacancy !!*👩🏻‍💻🧑‍💻👨‍💻

 

*सविस्तर वाचा 👇*

————————————————–

😇 *LIFE GOALS DONE*😇

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

 

🧑‍💻👩🏻‍💻 *Job Vacancy*👩🏻‍💻🧑‍💻

 

▪️Part Time / Full Time

▪️Earn Extra Income

▪️Post – Agency Sales Officer

▪️Qualification – 12th Above

▪️Fix Salary – 30,000/- ▪️Work Day / Training / Support Provided

▪️Employees / Housewife / Retired Person / Businessman / Professionals

 

📱Branch Head – 8087757388, 8550934448

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

🏢 Job Location – Sawantwadi

🏢 Branch Office – Mapusa, Goa

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − fourteen =