आचरा ग्रामपंचायतच्या शवपेटीचे सरपंचांच्या हस्ते लोकार्पण…
मालवण
आचरा गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते. आचरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही शवपेटीची सुविधा उपलब्ध नव्हती. आचरा गावासाठी शवपेटीची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. शवपेटीची गरज ओळखून आचरा ग्रामपंचायत मार्फत पंधरा वित्त आयोगातून आचरा गावासाठी शवपेटी खरेदी करत तीचे लोकार्पण आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते आचरा ग्रामपंचायत येथे करण्यात आले.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, अनुष्का गावकर, किशोरी आचरेकर, सारिका तांडेल, योगेश गावकर, सायली सारंग, चंद्रकांत कदम, हर्षदा पुजारे, श्रुती सांवत, पूर्वा तारी, माजी सरपंच डॉ प्रमोद कोळंबकर, अनिल करंजे, ग्रामस्थ जयप्रकाश परुळेकर, जगदीश पांगे, सचिन हडकर, किशोर आचरेकर, सचिन बागवे, नरेश परब पोलीस पाटिल विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.