You are currently viewing सत्यवान रेडकर यांचे नववर्षात ४-५ जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सत्यवान रेडकर यांचे नववर्षात ४-५ जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*सत्यवान रेडकर यांचे नववर्षात ४-५ जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्रातील लाखो युवकांचे प्रेरणास्थान, उच्चशिक्षित व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर,
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार, (संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था) खालील वेळापत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत.

*गुरूवार, ४ जानेवारी २०२४*
*सकाळी ९.०० वा.*
*डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा, ता. मालवण*

*दुपारी १.०० वाजता*
*शेठ महादेव केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगाव*

*शुक्रवार, ५ जानेवारी २०२४*
*सकाळी ९.०० वा.*
*रावसाहेब गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सरस्वती बाई वाळके कॉलेज ऑफ आर्ट्स, बांदा, ता. सावंतवाडी*

*सायंकाळी ५.०० वाजता*
*जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली, ता सावंतवाडी*

श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे एकही रूपया मानधन घेत नाहीत, त्यांची तिमिरातुनी तेजाकडे ही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक चळवळ स्वरूपात प्रसिद्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा