मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये ‘क्रीडा दिन संपन्न…
सावंतवाडी
सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये शै. वर्ष २०२३-२४ च्या ‘क्रीडा दिनाचे’ चे आयोजन २८ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझिमच्या तालावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले यांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आयोजित विविध क्रीडा प्रकारात प्री-प्रायमरी ते दहावी पर्यतची सर्व मुले हिरीरीने सहभागी झाली. प्री प्रायमरी साठी झिक ॉक रनिंग, फ्रॉग जम्प, इन अॅण्ड आउट, कॅचिंग द बॉटल, कलरिंग द पेपर्स इ. मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले तर प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी सॅक रेस, बुक बॅलन्सिंग, थ्रोइंग बॉल्स इन बकेट, रनिंग, बॉक्स कीकेट, रिले, खो-खो, लंगडी, लेमन अॅण्ड स्पुन, कलेक्टींग कोन्स, थ्रोइग बॉल्स इत्यादी विविध क्रीडा प्रकारांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. खेळांमध्ये विदयार्थ्यांनी खिलाडूवृत्ती व शिस्तपालन यांचा मेळ साधत आपले क्रीडाकौशल्य सादर केले.
सदर क्रीडा स्पर्धा यलो, ग्रीन, ब्ल्यू व रेड या चार हाऊसेस मध्ये घेण्यात आली. यामध्ये यलो हाऊस प्रथम क्रमांक, ग्रिन हाऊस व्दीतीय क्रमांक, रेड हाऊस तृतीय क्रमांक व ब्ल्यू हाऊस ने चौथा कमांक पटकावला. क्रीडा दिनाच्या समारोप प्रसंगी सर्व हाऊसेस ना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा दिनाचे प्रास्ताविक, स्वागत व आभार सहशिक्षिका श्रीम. प्राजक्ता मांजरेकर यांनी मानले. क्रीडादिनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कीडा शिक्षक श्री. भूषण परब व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतूक केले