You are currently viewing तृतीयपंथीयाच्या वेशात सावंतवाडीत फिरणारे तिघे तरूण ताब्यात…

तृतीयपंथीयाच्या वेशात सावंतवाडीत फिरणारे तिघे तरूण ताब्यात…

तृतीयपंथीयाच्या वेशात सावंतवाडीत फिरणारे तिघे तरूण ताब्यात…

सावंतवाडी

तृतीयपंथीच्या वेशात शहरात फिरणाऱ्या तिघा तरुणांना सावंतवाडी पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून थेट घरात घुसणे, पैशाची मागणी करणे, त्रास देणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची तक्रार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र उशिरा पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. ते कुडाळ येथे राहणारे असून मुळचे अकोला येथील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तिघे तरुण तृतीयपंथीचा वेश परिधान करून शहरात भिक मागत होते. विशेष म्हणजे पैसे मागताना थेट नागरिकांच्या घरात घुसणे, मोठ्या रक्कमेची मागणी करणे, धमक्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. गेले दोन ते तीन दिवस हा प्रकार सुरू होता. याबाबतच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.

दरम्यान आज दुपारी येथील सबनिसवाडा परिसरात हे तिघे जण फिरत असल्याची माहिती काही लोकांनी श्री. साळगावकर यांना दिली. त्यानु‌सार त्यांनी याकडे पोलिसांचे लक्ष वेधले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. ते तिघेही मूळ अकोला येथील असून सद्यस्थितीत कुडाळ येथे राहतात. तृतीयपंथींचा वेश परिधान करून ते जिल्ह्यात फिरतात, अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली. मात्र उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे कोणती कारवाई केली हे कळू शकले नाही.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा