You are currently viewing ‘सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागत

‘सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागत

*’सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागत*

पिंपरी

सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली, अशी माहिती मोहिमेचे नेते एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.
आदल्यादिवशी माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वांद्रे गावाजवळील नंदिकेश्वराचा मंदिरात सर्व गिर्यारोहक समूह पोहोचला. आज सकाळी म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ रोजी लवकरच गिर्यारोहक चमू सुळक्याच्या पायथ्याशी पोहचला. निसर्ग देवतेचे आणि सुळक्याचे पूजन करून सकाळी ठीक ९.५० वाजता चढाईस सुरवात करण्यात आली. चढाईचे संपूर्ण तांत्रिक नियोजन नेता श्रीहरी तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. सर्वप्रथम शरद पवळे यांनी चढाईस सुरुवात केली. त्यावेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) सत्यवान शिरसाट देत होता. अंगावर येणारी ९०° अंशातील खडी चढाई करत शरद आणि सत्यवान यांनी सुमारे ८० फुटांवरील दोन स्टेशनपर्यंत सुरक्षित चढाई केली. यानंतर अनिल पवळे यांनी सरळसोट कातळ भिंतीचा अवघड टप्पा यशस्वीपणे चढाई करत तिसरे स्टेशन गाठले. तेथून पुढे सर्वात आव्हानात्मक ओव्हरहँगची चढाई पुन्हा एकदा शरद यांनी अतिशय कौशल्याने पार करीत चौथे स्टेशन गाठले. आता सुळक्याचा माथा केवळ ३० फूट अंतरावर होता; परंतु तिथे मातीयुक्त खडकातील घसरडा आणि अतिशय निसरडा चढाई मार्ग होता. शरद पवळे आणि सत्यवान शिरसाट यांनी या टप्प्यात सुरक्षित चढाई करत दुपारी १.०० वाजता सुळक्याचा माथा गाठल्यावर ‘जय भवानी जय शिवाजी’ , ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.
यानंतर अनिल पवळे, हृषीकेश देवकर, प्रकाश ढमाले, राजेश जाधव यांनी सुळक्याच्या माथा गाठला. या सर्वांना सुरक्षितपणे चढाई करत असताना पहिल्या दोन स्टेशनपर्यंत पृथ्वीराज बोऱ्हाडे, अक्षय हत्त्ते यांनी चढाई केली. त्यावेळी पांडुरंग शिंदे यांनी तांत्रिक साहित्य नियोजन आणि बेस कॅम्प नियोजनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पडली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने वजीर सुळक्यावर आरोहण मोहिम यशस्वी करताना सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.
या मोहिमेचे नेतृत्व मोहिमेचे नेते एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी केले; तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी मोहिमेचे अभिनंदन मुंबईस्थित ज्येष्ठ गिर्यारोहक किरण आरफडकर, सचिन गायकवाड आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

– प्रवीण हरपळे
९०११०७३२३९

– श्रीहरी तापकीर
९४०४४१५५५४

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा