कुपेरी घाटीत चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत भीषण अपघात
मालवण
शुक्रवारी रात्री 9.15 वाजता मालवण-कसाल मार्गांवरील कुणकावळे येथील कुपेरीची घाटीत कुणकावळे ग्रामपंचायत नजीक चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत भीषण अपघात झाला.या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर सुदैवाने बालबाल बचावले. तसेच या मार्गावरून कट्टा ते मालवण असा दुचाकीने प्रवास करणारे पोलीस कर्मचारी यांच्या दुचाकी समोरच अपघात घडल्याने तेही बचावले. मात्र या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की सदर ट्रक (KA-31-7165)हा नेहमीप्रमाणे चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करायचा शुक्रवारी रात्री नऊ वाजता चिरे भरून चौकेतून निघालेला ट्रक कुपेरी ची घाटी उतरत असताना अचानक ट्रक मध्ये बिघाड झाल्याने ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. हा अपघात दूचाकीने मालवण येथे जाणारे कट्टा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी चीपकर यांच्या अगदी समोरच घडला.
अपघाताची बातमी समजतात कुणकावळे -चौके -साळेल येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस ट्रक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरुन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.यावेळी कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, सामाजिक कार्यकर्ते पप्पू वराडकर, चौक येथील चिरेकर व्यावसायिक बिजेंद्र गावडे, संतोष गावडे,मोहन गावडे यांच्यासह कुणकावळे चौके साळेल येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदत कार्यात सहभाग घेतला अपघातात तसे पूर्णतः नुकसान झाले आहे .
दैव बलवत्तर आणि पोलीस रूपाने आलेला देवदूत
एवढा मोठा भीषण अपघात होऊनही ट्रक मधील चालक- क्लिनर तसेच अपघाताच्या स्थळी समोरच दुचाकीवर असलेले पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावले.चिपकर यांना क्षणात काही कळलेच नाही तरीही त्याच परिस्थितीत त्यांनी अपघातातील चालक व क्लीनर यांना सुखरूप बाहेर काढून धीर देत बाजूला बसवले. अजून थोडा जरी वेळ आतमध्ये अडकले असते तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता मात्र पोलीस कर्मचारी चिपकर हे देवदूता सारखे धावले आणि त्यांचे प्राण वाचवले.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*