*वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार*
श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या मंगलकलशाची यात्रा वेंगुर्लेत काढण्यात येणार आहे .
वेंगुर्ले तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . या मंगल कलशाची ग्रामदैवत रामेश्वर चरणी विधिवत पुजा आर्चा करुन , त्यानंतर तो मंगलकलश पालखी मध्ये ठेवून , त्या मंगलकलशाची मोटरसायकल रॅलीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे .
हि शोभायात्रा रामेश्वर मंदिराकडुन सुरु होऊन गावडेश्वर मंदिर – शिरोडा नाका – कलानगर – मांडवी – दाभोसवाडा – जुना एस. टी.स्टॅन्ड – दाभोली नाका – मार्केट – मारुती मंदिर – हॉस्पिटल नाका – भटवाडी पेट्रोल पंप – आडी स्टाॅप – वरसकर स्टाॅप – संत लालाजी मंदिर मठ मार्गे खांबड भटवाडी – गणपती मंदिर – डाॅन्टस काॅलनी – गवळीवाडा – पाॅवर हाऊस – सातेरी मंदिर – राऊळ वाडा मार्गे राम मंदिर येथे यात्रेची समाप्ती होईल .
या यात्रेचे पुर्वस मंदिर , शिरोडा नाका , दाभोसवाडा , जुना एस.टी.स्टॅन्ड , गिरपवाडा , दाभोली नाका , मार्केट , मारुती स्टाॅप , हॉस्पिटल नाका , वडाचे सांदेकर – भटवाडी , आनंदि अर्पित , वरसकर स्टाॅप , संत लालाजी मंदिर – मठ , गणपती मंदिर , नक्षत्र – डाॅन्टस काॅलनी – गवळीवाडा – कॅम्प काॅर्नर – सातेरी मंदिर – राऊळ वाडा व राममंदिर येथे यात्रेचे स्वागत होईल .
तरी या शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंदुधर्माभिमानी मंडळींनी केले आहे .