मंगळवारी जिल्हा कार्यकारिणीची तातडीची बैठक
सिंधुदूर्ग
सिंधुदूर्ग मधील ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस ने या निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
दरम्यान, मंगळवारी १५ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची तातडीची सभा सकाळी १०.३० वाजता ओरोस येथील काँग्रेस जिल्हा कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात विचारविनिमय करणे, निरिक्षक नेमणे या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, प्रदेश प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष, आजी माजी खासदार व आमदार, पक्षाचे लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, माजी जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी
सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस चंद्रशेखर जोशी व महेंद्र सावंत यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या सूचनेनुसार केले आहे.