You are currently viewing ५३ निवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती

५३ निवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती

५३ निवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी

 शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्ह्यातील गरज असणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या शाळेवर 53 निवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रदिपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे.   

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या जिल्हा परिषदेच्या एकुण 1360 शाळा असून मंजूर शिक्षक संच मान्यता 2022-23 नुसार 3873 आहेत. माहे ऑक्टोबर अखेर कार्यरत शिक्षक 2711 आहेत. रिक्त पदे 1162 आहेत. सद्यस्थिती मध्ये शुन्य शिक्षकी एकुण शाळा संख्या 121 एवढी आहे. तालुक्यातील नजिकच्या शाळेतून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून 127 शिक्षकांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदरची पर्यायी व्यवस्था शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून करण्यात आलेली आहे. दिनांक 7 जून 2023 च्या शासन परिपत्रकानुसार सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करणेबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांना सुचना देऊन एकूण 53 सेवा निवृत्त कंत्राटी शिक्षकांना तालुक्यातील गरज असणाऱ्या व रिक्त पद असणाऱ्या शाळेवर नियुक्ती देण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा