सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतसाठी मुख्यालय पत्रकार संघाचे २७ ला धरणे…
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा मुख्यालय होऊन तब्बल २५ ते ३० वर्षे लोटली तरी जिल्हा मुख्यालयाचा दर्जा असलेल्या शहराला अजुनही शासन नगरपंचायत करण्यात राजकीय सारीपाठावर दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय समोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे. जिल्हा मुख्यालय परिसरातील सिंधुदुर्गनगरीसह रानबांबुळी, ओरो, आणाव गावातील जनतेने उपस्थित राहून आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे व सचिव लवू महाडेश्वर यांनी केले आहे.