*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम बालगीत*
*सांताक्लाॅज*
सांताक्लाॅज सांताक्लाॅज
दिसता किती तुम्ही छान
मोठी दाढी मोठ्या मिशा
नावासारखी तुमची शान ॥१॥
टोपी आहे तुमची लाल
कित्ती फुगवले तुम्ही गाल
नाताळ गाणे तुमचे मोहक
धरतो आम्ही बालक ताल ॥२॥
डोळा झालर पांढरी भिवई
झगा मोठ्ठा देखणा मस्त
खाऊ फक्कड आणता तुम्ही
आम्ही मुले करतो फस्त ॥३॥
दाखवा आम्हा लोभस सगळी
तुमच्या झोळीमधली खेळणी
सांताक्लाॅजचा अभिमान आम्हा
नाचू गाऊ ख्रिसमस गाणी ॥४॥
🙏🙏
लेखन—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर , ता.साक्री, जि.धुळे.
४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११