You are currently viewing ‘महासंग्राम – खासदार करंडक २०२३’ मध्ये “खुदीराम” सर्वोत्कृष्ट एकांकिका

‘महासंग्राम – खासदार करंडक २०२३’ मध्ये “खुदीराम” सर्वोत्कृष्ट एकांकिका

*चिंतामणी कलामंचच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे निकाल जाहीर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मराठी रंगभूमीचे विस्तृत साम्राज्य जोपासणे ही सर्व रंगकर्मींची जबाबदारी आहे. या साम्राज्यात व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना प्राधान्य दिले जात असले तरी एकांकिका ही प्रथम पायरी असते. या विश्वात नाट्यकर्मींना संधी देण्यासाठी नवनवीन एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. गेले ४ वर्ष अशीच एक स्पर्धा लोकप्रिय होत आहे. चिंतामणी कलामंच आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘महासंग्राम – खासदार करंडक २०२३‘.

 

चिंतामणी कलामंच २०१८ साली ‘प्रथमेश पिंगळे’ यांनी सूरू केले. प्रथमेश पिंगळे हे एक उत्कृष्ट संकलक असून त्यांना नाटकांची प्रचंड आवड आहे. अनेक नाटयसंस्था एकांकिका स्पर्धांमार्फत कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध पारितोषिके देतात. परंतु त्यातही चिंतामणी कलामंच या संस्थेने वैविध्य जोपासले आहे. साधारण ४ फूट उंचीचे सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात येते. चिंतामणी कलामंच यांनी यापूर्वी लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म फेस्टीवलचे आयोजनही केले आहे.

 

चिंतामणी कला मंचला गेली अनेक वर्षे शिवसेना नेते, खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांचे मोलाचे योगदान ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लाभत आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम पूर्णत्वास जातो.

 

‘महासंग्राम – खासदार करंडक २०२३‘ यशस्वी होण्यासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, बी. एस. ई., हिंदुस्तान पेट्रोलियम, यांचे प्रायोजकत्व लाभले. तर स्पर्धेचे फूड स्पॉन्सर माँ के हात का खाना आणि मनिस कॅफे हे होते. तर स्पर्धेत भाग घेणाऱ्या रंगकर्मींचे तसेच विजेत्या संघांचे मनोबल वाढवण्यासाठी हकुना मटाटा या रिसॉर्टच्या मालकांनी म्हणजे जय जोशी यांनी सर्वांना मोफत गिफ्ट व्हाऊचर दिले.

 

चिंतामणी कला मंचचे अध्यक्ष प्रथमेश दिपक पिंगळे, खजिनदार पूजा मोहिते आणि स्पर्धाप्रमुख दिव्या पेटकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ आणि १९ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.

 

त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे या विभागातील संस्थांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे परीक्षण मराठी चित्रपसृष्टीतील तसेच मराठी नाट्य सृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते समीर पेणकर तसेच मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी तसेच छोट्या पडद्यावरील मालिकांमधून झळकणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुशील इनामदार यांनी निरपेक्षपणाने केले.

 

*अंतिम फेरीतल्या विजेत्यांची यादी :-* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – खुदीराम – क्राऊड नाट्य संस्था, सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – एकूण पट – १ – वझे केळकर महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – पडदा – नाट्य परिवार ठाणे, सर्वोत्कृष्ट एकांकिका उत्तेजनार्थ – द आऊटबस्ट – बँक स्टेजवाला ग्रुप, सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम – सिद्धेश साळवी – एकूण पट – १, सर्वोत्कृष्ट लेखन द्वितीय – अन्वय अष्टीवकर – द आऊटबस्ट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम – आशुतोष पोपट जरे – खुदीराम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय – अमित पाटील, सिद्धेस साळवी एकूण पट- १, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम – राजेश शिंदे – खुदीराम, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय – सिद्धेश नांदलस्कर पडदा, सर्वोत्कृष्ट संगीत प्रथम – संकेत पाटील – खुदीराम, सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय – सौमित्र, आशिष, सिद्धेश, गायत्री – द आऊटबस्ट, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम – राहुल ढेंगळे, सागर धनगर – खुदीराम, सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय – अद्वैत, अमित, प्रथमेश – एकूण पट – १, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम – प्रणव सकपाळे – १६५०, सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय – आशुतोष पोपट जरे – खुदीराम, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – राजश्री जमदाडे – इंट्रोगेशन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय – साक्षी मणचेकर – पडदा, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनय – आदित जमदरे – पडदा, अभिनय उत्तेजनार्थ – अक्षता सामंत (दगड, स्वबोध, डोंबिवली), केसर खांडगावकर (डोंगरावरची म्हातारी, इंदिरा गांधी महाविद्यालय), मनस्वी लगाडे (एकूण पट – १, वझे केळकर महाविद्यालय), सानिका देवळेकर (उणीवांची गोष्ट, सतिष प्रधान महाविद्यालय), डॉ. यशस्वी कंटक (संपर्क क्रमांक, कलासक्त, मुंबई), गौरव सरफरे (द आऊटबस्ट, बॅकस्टेजवाला प्रोडक्शन), अक्षय खांबे (डोंगरावरची म्हातारी, इंदिरा गांधी महाविद्यालय), शिवराम गावडे (दगड, स्वबोध, डोंबिवली), अजय पाटील (उणीवाची गोष्ट, सतिष प्रधान महाविद्यालय), यतीन तोसकर (द मुंबई स्टोरी, सचिवालय जिमखान, मुंबई).

 

चिंतामणी कला मंच आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महासंग्राम खासदार करंडक २०२३ चा बक्षीस समारंभ सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक दिग्दर्शक प्रताप फड तसेच सुप्रसिद्ध समाजसेवक विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

स्पर्धेला आणि स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलेल्या वच्छि मावशी म्हणजेच वर्षा दांदळे यांनी खास हजेरी लावली.

 

स्पर्धेला मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर, दीपक गुंडये, ठाणे लाईव्ह, किरण जाधव, महेश कदम, हितेश जाधव, हर्षद घाडीगावकर, श्री. तटे, सायली आडीवरेकर, निष्ठा वत्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

महासंग्राम खासदार करंडक २०२३ ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रणय अहेर,अजय पाटील, मयुरी दंडवते, निलेश कदम, आशिष साबळे, किरण पेडणेकर, गौरव बोंद्रे, आनंद कोरी, प्रतिमा गावडे, केतन कदम, रोहन साखरे, आकाश घडवले, कल्पेश सकपाळ आणि अनिरुद्ध कूपटे यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा