You are currently viewing वेंगुर्लेतील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

वेंगुर्लेतील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी उपसरपंच सौ.उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजप चे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी विजय सावंत यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन यशवंत कापडी यांचे अभिनंदन केले. भाजपची सत्ता असलेल्या पालकरवाडी ग्रा. प. ची उपसरपंच निवड शुक्रवारी झाली. यावेळी सरपंच बंड्या पाटील, सूर्याजी नाईक, माजी उपसरपंच उमा करंगुटकर, नंदिता शेर्लेकर , शुभदा गोसावी, नारायण शेर्लेकर, आबा येरम, भाऊ गावडे , दीपक करांगुटकर, समीर गोसावी, विकास अन्सुरकर, संगीता परब , दीपक मोहिते, दिनकर पालव, दर्शना पालकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा