• Post category:इतर
  • Post comments:0 Comments

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

मालवण तालुक्यात सर्वाधिक 10.00 मी.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी : 

गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून मालवण तालुक्यात सर्वाधिक 10.00 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 5.375  मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 3862.494 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग  1.00 (4089.00), सावंतवाडी 7.00  (4345.00), वेंगुर्ला 3.00 (3590.40), कुडाळ 9.00 (3739.55), मालवण 10.00 (4574.00), कणकवली 9.00 (3628.00), देवगड 0.00 (3199.00), वैभववाडी 4.00(3735.00), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा