You are currently viewing स्मृति भाग १२
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्मृति भाग १२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग १२*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण *कात्यायन* स्मृतितील काही श्लोक पाहू . तत्पूर्वी काही मनातले . ” हंः काय होतं ? आणि , याने काय फायदा ? ” या दोन प्रश्नांनी बरंच काही रसातळाला नेलं , हे विसरुन चालणार नाही . डी एड काॅलेजच्या विद्यार्थ्यांना एक प्रयोग शिकायला आहे . त्याचे नाव “अभिजात अभिसंधान “. रशियन शास्त्रज्ञ पाॅवलाॅवचा ! भारताव्यतिरिक्त कुणाचं ही नाव घेतलं की लगेच कान टवकारतात ना !! प्रयोग असा , घंटी विशिष्ट वेळेला वाजवली की कुत्रा जेवायच्या आशेने मालकाजवळ येतो ! जोवर घंटी वाजत नाही तोवर तो समजतच नाही की जेवायचंय ! ” घंटी वाजवली की त्याचे पोटात रस पाझरुन भूक लागते ! ” हा सिद्धांत ! मी आपणा सर्वास हे विचारतो , —जाग आल्यावर श्लोक म्हटले की डोळ्यावर झापड पण रहाणार नाही ! अंघोळ करतांना , दांत घासतांना , जेवतांना , झोपतांना इ. क्रिया करतांना जे श्लोक म्हटले जायचे त्याने आपल्या शरीरात वा मनात तशा प्रकारचे रस वा भाव पाझरणार नाहीत ! आमच्या ऋषिंची ही संस्कृतीला दिलेली देणगी आम्हाला जपाविशी वाटली नाही तर आमच्यासारखे करंटे कोण ! अध्यात्म आणि विज्ञानाचा अतूट संगम म्हणजे भारतीय संस्कृति , हीच व्याख्या माझ्या संस्कृतीची . अन्य नाहीच . आम्ही आंधळे बनलो तर इतर टोचे मारतीलच ना ! एकसंघ व्हावं संस्कृतिसाठी सर्वांनी प्रथम . असो.

*अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम् ।*
*हौमो दैवो बलिर्भौतो नृयज्ञोSतिथिपूजनम्॥*
अध्यापन ब्रह्मयज्ञ आहे , तर्पण पितृयज्ञ आहे , होम देवयज्ञ आहे , बळि देणे हा भूतयज्ञ आहे आणि अतिथीसेवा हा मनुष्ययज्ञ आहे .
अध्यापनाबद्दल आज न बोललेलेच बरे ! फक्त मनात हा विचार प्रथमपासून की ज्याने गृहस्थामात प्रवेश केलेला आहे , अध्यापक असाच असावा ! तो ब्रह्मचारी नसावा . पण सरकारचे डोळे अजून आंधळेच ! आणि न्यायसंस्था ही त्याबाबतीत अविचारी !!
ब्रह्मयज्ञाचे वेळेस कुबेराजवळ काय मागावं ! — हे सर्वसाक्षी कुबेरा , ” आरोग्य , आयु , ऐश्वर्य , धी ( निश्चयात्मका बुध्दि ) , धृति ( धारणाशक्ति ) , शान्ति , बल , यश , ओज , तेज , पशु , वीर्य , ज्ञान , ब्राह्मणत्व , सौभाग्य , कर्मसिद्धि , कुळाची उत्तमता आणि शुभकर्म करण्याची प्रवृत्ति इ. सगळे मला मिळावे ! ” हे मागितले आहे . मागण्यातसुध्दा सौंदर्य ! यात ब्राह्मणत्व ही मागितले आहे ! याचा अर्थ , गुणकर्मावर मिळणारे ब्राह्मणत्व समजावे . बळि देण्याचे संदर्भात ज्यावेळेस हिंसा बंद झाली त्यावेळेस सगळ्यांनी मिळून विचार केला असावा ( जो आजवर बर्‍याच अंशी काही समाज बांधवांनी टिकवून धरला आहे ! ) व माष म्हणजे उडीदाचे वडे ! यासारखे पदार्थ माष—मांस अशा समान उच्याराने प्रतिनिधी स्वरुपात आले ! शिवाय ” स्थालिपाके पशुस्थाने ” असा स्पष्ट उल्लेखही संहितेत आहेच. पण आता तर सगळ्यांसह काही ब्राह्मणांनीही तंत्र सोडले आहे ! ठीक आहे . कोरोनाचे संकट चीनच्या मांस मंडीतूनच आले , हे कसं विसरावं ! तरी मांसाहारावर अवलंबूनच रहावं ! आतिथ्य भारतीयांना काय सांगावं ! मला आतिथ्यात श्रेष्ठ वाटतात माझे भारतीय बांधव ! 🙏🙏

*मनसा नैत्यकं कर्म प्रवसन्नप्यतन्द्रितः ।*
*उपविश्य शुचिः सर्वं यथाकालमनुद्रवेत् ॥*
प्रवासातसुद्धा आळसरहित होवून पवित्र होवून बसून सगळ्या नित्यकर्माचे काळानुसार मनाने अनुष्ठान करावे .
केवढी मोकळीक ! असंच हवं , तसंच हवं , हा अट्टाहासच नाही ऋषिंचा ! अडचणीचे वेळेस कर्म कसे करावे ? हा श्लोक सहज शिकवतो ना ? आम्ही काही शिकू यातून ?

*श्लेष्माश्रु बान्धवैर्मुक्तं प्रेतो भुङ्क्ते यतोSवशः।*
*अतो न रोदितव्यं हि क्रियाः कार्याः प्रयत्नतः॥*
नातेवाईकांकडून सोडलेले श्लेष्मा व अश्रु प्रेतास अवश्य प्यावे लागतात ! म्हणून न रडता सर्व क्रिया यत्नपूर्वक करावयास हव्या .
किती युक्तियुक्त कथन आहे सांत्वनपर ! हा अध्यायच वाचण्यासारखा आहे .
पुन्हा सांगायचे एवढेच , कात्यायन स्मृति वाचनीय आहे . उद्या पराशर स्मृतिला सुरवात करु .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा