You are currently viewing श्री मार्तंड फिल्म्स आणि शिव उद्योग आयोजित पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

श्री मार्तंड फिल्म्स आणि शिव उद्योग आयोजित पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

*सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन*

 

मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) :

श्री मार्तंड फिल्म्स आणि शिव उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२४ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ श्रेणीतील विजेते निश्चित करण्यासाठी निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नामवंत चित्रपट निर्माते आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश असलेल्या परीक्षकांच्या मार्फत होणार आहे.

श्री मार्तंड फिल्म्स आणि शिव उद्योग लघुपट निर्मितीतील उत्कृष्टतेला खालील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम तीन पुरस्कारः या पुरस्काराच्या प्राप्तकर्त्याला रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच २ विशेष ज्युरी पुरस्कार स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि त्यासोबतच इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.

श्री मार्तंड फिल्म्स आणि शिव उद्योग यांचा पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव हा २३ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. आपले प्रवेश अर्ज ५ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पाठवायचे आहेत. अधिक तपशीलासाठी आपण प्रकाश ओहळे – 9702058930, स्नेहल शेलटकर – 9322003321 अथवा व्हॉटसॲप क्र. 8828267350 ईमेल casting.mkc@gmail.com यावर संपर्क साधू शकता.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा