You are currently viewing काँग्रेस स्थापना दिना निमित्त नागपूर येथे होणाऱ्या महारॅलीला सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार

काँग्रेस स्थापना दिना निमित्त नागपूर येथे होणाऱ्या महारॅलीला सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार

*काँग्रेस स्थापना दिना निमित्त नागपूर येथे होणाऱ्या महारॅलीला सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार*

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची तातडीची सभा काँग्रेसचे नेते रमेश किर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे पार पडली. यावेळी बोलताना रमेश किर यांनी सांगीतले की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या गौरवशाली इतिहासाची 138 वर्षे पूर्ण केली आहेत.अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वा खाली दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी आपण 139 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी 139 वा काँग्रेस स्थापना दिन राष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला असून नागपूर येथे राष्ट्रस्तरीय *है तैयार हम* या *महारॅलीचे* आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या ऐतिहासिक महारॅलीच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला दिली असून ती आपणा सर्वांसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भूषणावह बाब आहे. या महारॅलीला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. मल्लिकार्जुन खरगे, आपल्या नेत्या काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा मा. खा. श्रीमती सोनियाजी गांधी, आपले नेते मा. खासदार श्री. राहुलजी गांधी, मा. श्रीमती प्रियांकाजी गांधी, देशातील काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते व राष्ट्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या महारॅलीला दहा लाख लोकांची उपस्थिती असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या महारॅलीस जाणार असून या संदर्भात नियोजन करण्यात येत आहे. या सभेला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, रमेश किर, माजी जिल्हाध्यक्ष व प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, सरचिटणीस प्रविण वरुणकर, अरविंद मोंडकर,सचिव रविंद्र म्हापसेकर, उल्हास मणचेकर, आनंद परूळेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर,सुंदरवल्ली स्वामी, सोनल सावंत, रुपेश रेवडेकर,महेंद्र मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा