You are currently viewing २२, २३ व २४ डिसेंबर रोजी परब मराठा संस्थेचा हीरक महोत्सव सोहळा होणार जल्लोषात

२२, २३ व २४ डिसेंबर रोजी परब मराठा संस्थेचा हीरक महोत्सव सोहळा होणार जल्लोषात

ओरोस :

 

परब मराठा समाज मुंबई या संस्थेने २२ डिसेंबर १९६३ रोजी परब समाजाच्या उन्नतीसाठी मुहूर्तमेढ रोवली होती. साठ वर्षाचा कार्यकाळ लोटला असून परब समाजाच्या विकासासाठी संस्थेचे योगदान फार मोठे आहे. परब मराठा संस्थेचा हीरक महोत्सव सोहळा २२, २३ व २४ डिसेंबर रोजी सिंधुनगरी ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमाने साजरा होत आहे. याच वर्धापन दिनाच्या निमित्ताने परब समाज पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधूनगरी येथे एकवटत आहे. या तीन दिवसांमध्ये परब कुटुंबीय व अन्य समाजासाठीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व समाजासाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान, परब कुटुंबातील मुलांचा गुणवंतांचा सत्कार, परब नेतृत्व व ज्येष्ठांचा सत्कार असा विविध कार्यक्रम होणार आहेत. याबाबतचे विस्तृत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद झाली.

त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, जिल्हा संघटक विनायक परब, परब क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक श्रीमती राधिका परब, कुडाळ तालुका संघटक आर एल परब, कणकवली संघटक शंकर तुकाराम परब, मालवण संघटक जयेंद्र बुधाजी परब, कुडाळ सह संघटक सुशील अर्जुन परब, बाळकृष्ण यशवंत परब, शुभम शरद परब, समीर चंद्रकांत परब, ओम सुशील परब संतोष परब सचिन परब व विनोद परब आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सिंधुदुर्गातील परब समाज मुंबई, पुणेसह राज्यभर पसरला आहे. या समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम परब मराठा समाज मुंबई या संस्थेने गेली साठ वर्षे केले आहे. ‘भावकी व आपुलकी’ हे घोषवाक्य घेऊन परब समाज व परब समाजातील अन्य नातेसंबंध असलेल्या समाजाला सोबत घेऊन हे मराठा नातेसंबंध आणखी घट्ट होतील या दृष्टीने परब मराठा समाजाने पुढाकार घेतल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परबांचे प्राबल्य मोठे असून मराठा समाजातील परब समाजाचे नातेसंबंधही मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व समाजाला बरोबर घेऊन परब समाज स्वतः व नातेसंबंधातील समाजाला संघटित ठेवून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्याप्रमाणे गुजराती समाज संघटित होत आहे त्याच धर्तीवर मराठा समाज आणखी पुढे जावा अशी संकल्पना घेऊन परब समाज पुढील कार्य करणार आहे, असेही दीपक परब यांनी स्पष्ट केले.

या शिबिरात तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच आवश्यक मशनरी उपलब्ध राहणार असून रुग्णांना आवश्यक औषध पुरवठाही केला जाणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी परब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम व रात्री करमणुकीसाठी सदाबहार कार्यक्रम होणार आहे.

दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी रवळनाथ मंदिर ते शिवपुतळा व इच्छापूर्ती मंगल कार्यालय येेेेथे ढोल पथकासह शोभायात्रा, दीप प्रज्वलन, मुख्य कार्यक्रम, परबभूषण सत्कार, स्मरणिका व कॅलेंडर प्रकाशन पाहुण्यांचा सत्कार व मनोगत कार्यक्रम होणार आहे. परब समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी, तसेच परब कुटुंबियांच्या व्यावसायिक विकासासाठी या संघटनेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

कणकवली व सिंधुदुर्ग रोटरी क्लबच्या वतीने परब मराठा संस्थेमार्फत २४ डिसेंबर सिंधूनगरी येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर, मोफत औषध वाटप व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा फायदा परब समाजाबरोबर अन्य समाजातील नागरिकांनाही घेता येणार आहे. तरी सर्वच नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, असे आव्हान श्री परब यांनी केले आहे.

परब कुटुंबियांची यलो पेज डायरी, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी निधी संकलनाचा संकल्प, वधुवर सुचक केंद्राचे काम, महिलांच्या उन्नतीसाठी योजना हे संकल्प परब समाज जाहीर करणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील परब समाजाने मनापासून सहभागी व्हावे व हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन दीपक परब व या संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा