You are currently viewing हुरडा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

हुरडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*हुरडा*

हुरडा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातलं एक सांस्कृतिक संचितच..
कोवळा लुसलुशीत, गुळभेंडीचा, कुचकूचीचा. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यानं खवय्यांची हौस भागवणारा. नातेसंबंधांचे आणि मैत्रीचे धागे अधिक हृढ करणारा.. शेतक-याचा रानमेवा म्हणूनही ओळखणारा..
हुरडा म्हणजे ज्वारीचे
कोवळे दाणे…ज्वारीचे कणीस लागल्यावर साधारण तीस ते चाळीस दिवसातील दाणे कोवळे समजले जातात… हे दाणे रंगाने हिरवे असतात ते अधिक रसदार असतात…
भरलेली पण कोवळी कणसं आगटीत (शेकोटीत) भाजून ती हातावर चोळली किंवा पोत्यावार बदडली तर ज्वारीचे जे दाणे बाहेर येतात त्याला ‘हुरडा’ असे म्हणतात.
कडाक्याची थंडी आणि पहाटे गरम हुरडा, गूळ, चटणी आणि दही ही ज्वारीची ओळख…!
ज्वारीचे पीक बहारात आल्यानंतर पिका शेजारी आगटी (शेकोटी) पेटवून बोचऱ्या थंडीत घेतलेला गरमागरम हुरड्याचा आस्वाद काही औरच…!!
ज्वारी ही कोवळी असताना ताजी कणसे निखाऱ्यावर भाजून हुरडा बनविला जातो. हा हुरडा अत्यंत पौष्टिक समजला जातो…
कणसं चांगली भाजली की गरम गरम कणसं थेट हातावर घेऊन चोळून त्यातील चवदार दाणे बाहेर काढतात. जेव्हा त्यातील हिरवेगार कोवळे भाजलेले गरमागरम दाणे हातावर ठेवतात तेव्हा…वाह वाह व्वा.. ! असे नकळत उद्गार आपल्या मुखातून बाहेर पडतातच…
कणीस भाजून त्यातले हिरवेगार दाणे काढून ते बोचणाऱ्या थंडीत खाण्यात खूप मजा असते… ही मजा एकदा तरी अनुभवावीच..!
बोचणारी गुलाबी थंडी त्यात शेकोटीची उबदार हवा… याबरोबरच कोवळ्या ज्वारीच्या कणसांना भाजून तिखट चटण्यांसोबत त्याचा आस्वाद घेण्यात एक वेगळाच आनंद असतो…!
कणसात दाणे भरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुधाळ दाणे हिरवे होऊन भरू लागले की त्याला ज्वारी हुरड्यात आली असे म्हणतात.. या अवस्थेतील टपोरी कणसे हुरड्यासाठी निवडली जातात. ज्वारीच्या ताटावरून कणसे खुडताना त्यांचा दांडा लांब ठेवला जातो. लांब दांड्यामुळे कणीस विस्तवात भाजायला सोपे जाते… हुरड्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेकोटी तयार केली जाते..
वाऱ्यापासून संरक्षण आणि निखारे जास्त वेळ फुलत राहावेत म्हणून शेतातच लहान खड्डा खणून त्यात गोवऱ्या पेटविल्या जातात. जाळ संपल्यानंतर कणसे निखाऱ्यात ठेवण्यात येतात. चारही बाजूने चांगला ताव बसण्यासाठी कणसे वेळोवेळी फिरवतात आणि मग चांगल्या खरपूस भाजलेल्या कणसांचे दाणे म्हणजेच हुरडा.. हा हुरडा काढण्यासाठी ती तळहात किंवा दगडावर रगडतात. दाण्यांवरील कण्या नीट निघाल्या नाहीत तर घशाला त्रास देतात यामुळे कणसे रगडण्याची कला हुरडा तयार करण्यात सर्वाधिक महत्त्वाची समजली जाते.
कडाक्याच्या थंडीत शेतात शेकोटी पेटवून जोडीला हुरडा, चटणी आणि मडक्यातल्या गोड दह्याची मेजवानी आणि रात्रीच्या जेवणाला चुलीवरच्या गरम भाकऱ्या, वांग्याची भाजी
अन् मिरचीचा ठेचा..असा फक्कड बेत…! अहाहा..!
स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच..!
इतकच नाही तर हुरड्याची भेळ, हुरड्याचे थालीपीठ, हुरड्याची भजी, हुरड्याचे वडे असे विविध प्रकार सुद्धा या हुरड्या पासून बनविले जातात.
हिवाळ्यातील रम्य सकाळ..
बाहेर मस्त हुडहुडी थंडी, शेतातलं नयनरम्य असं वातावरण, श्वासात पूरेपूर भरलेला ताजेपणा, आगटीचा ( शेकोटीचा) गरमागरम शेक, भाजलेल्या कणसांचा खरपूस वास आणि सोबत आपली माणसं, हातात हुरड्या सारखं साधं, सोपं सकस असं स्वर्गीय सुख…
जगायला आणखी काय हवं… !!
हुरडा पार्टीच्या निमित्ताने एकत्र जमून गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत गप्पांच्या छान मैफिली रंगायच्या… अलीकडे असे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत. आपली ग्रामीण संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने हुरडा पार्ट्यांसाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत.

लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा