You are currently viewing केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी अमलात आणलेल्या अल्पसंख्याकांसाठीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी अमलात आणलेल्या अल्पसंख्याकांसाठीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

*केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी अमलात आणलेल्या अल्पसंख्याकांसाठीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा*

*व्हिक्टर फर्नांडिस , जिल्हा अध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा*

अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जनहिताचे कार्यक्रम राबवुन समाज कार्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे , असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केले .
वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांचे स्वागत भाजपा जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना व्हिक्टर फर्नांडिस म्हणाले की , अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक व सामाजिक प्रगती झाली पाहिजे , व शैक्षणिक प्रगती झाली तरच आपोआप त्यांचा आर्थिक विकास होईल . यासाठी अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांची माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले .
*अल्पसंख्याक विद्यार्थी , महीला , बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाखा पर्यंत कर्ज* —— मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी , महीला , बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत . मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , पारसी , जैन , बौद्ध आणि ज्यु समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा . महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते . अल्पसंख्याक महीला बचतगटांसाठी सुष्म पतपुरवठा योजना राबवली जाते. या अंतर्गत क्रेडिट लाईन १ मधील बचत गटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये प्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते . त्याचा फायदा घ्यावा , असे आवाहन केले .
यावेळी अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी रफिक गुडु शेख यांची , तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी उभादांडा मा. सरपंच इलीहास पेद्रु फर्नांडिस व वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी सायमन आल्मेडा यांची निवड करण्यात आली .
यावेळी महीला मोर्चाच्या हसिनाबेन मकानदार , रेमेत ब्रीटो , विन्सेंट डिसोझा , मुनीर बागवान , पारपेट डिसोझा , अब्दुल रेहमान शेख , फास्कु आल्मेडा , अस्लम मेहमूद शेख , रुजाय फर्नांडिस , मेहमूद मकानदार , ॲराॅन फर्नांडिस , ग्रेक फर्नांडिस , फीलीप आल्मेडा , लिना फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा